Video : पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक
बुलेट अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. तरूणाईमध्ये या बाईकची क्रेझ दिसते. अनेकजण आपल्या बुलेटला एवढं जपतात की त्यावर आलेला एक ओरखडाही त्यांना सहन होत नाही. पण सध्या एक व्हीडिओ वाऱ्या सारखा व्हायरल होतोय. यात नव्या कोऱ्या बुलेटला आग लागलेली पाहायला मिळतेय.
मुंबई : बुलेट (Royal Enfield Bullet) अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. तरूणाईमध्ये या बाईकची क्रेझ दिसते. ही गाडी खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते. पण तिची किंमता पाहता अनेकांच्या खिश्याला ती परवडत नाही. त्यामुळे अनेकांचं स्वप्न अधुरं राहतं. पण ही आपली स्वप्नवत गाडी डोळ्यासमोर जळून खाक झाली तर…? ही कल्पना करणंही अनेकांना परवडणारं नाही. आतापर्यंत आतापर्यंत आपण अनेक चारचाकी गाड्यांना, इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या घटना पाहिल्या आहेत. पण बुलेटला लागलेली आग (Bullet fire) ही दुर्मिळ घटना आहे. आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) एका नव्या कोऱ्या बुलेटला भीषण आग लागली. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.
बुलेटला आग व्हीडिओ व्हायरल
बुलेट अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. तरूणाईमध्ये या बाईकची क्रेझ दिसते. अनेकजण आपल्या बुलेटला एवढं जपतात की त्यावर आलेला एक ओरखडाही त्यांना सहन होत नाही. पण सध्या एक व्हीडिओ वाऱ्या सारखा व्हायरल होतोय. यात नव्या कोऱ्या बुलेटला आग लागलेली पाहायला मिळतेय.
కసాపురంలో బుల్లెట్ బండి మైసూరు నుండి కసాపురం కు నాన్ స్టాప్ గా వచ్చినందుకు పేలిపోయింది #guntakal #RoyalEnfield #Bullet #bike #fire #ACCIDENT #RoyalsFamily #RoyalEnfield pic.twitter.com/GGaRAnCY5x
— Allu Harish (@AlluHarish17) April 3, 2022
कर्नाटकमधल्या म्हैसूर इथे राहणाऱ्या रविचंद्रा नावाच्या व्यक्तीने नवी बुलेट खरेदी केली. या बुलेटची पूजा करण्यासाठी तो आंध्रप्रदेशमधल्या प्रसिद्ध कासापुरम आंजनेय स्वामी मंदिरात गेले. उगाडी सणानिमित्त तिथे रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळे तिथे मोठी गर्दी होती. रविचंद्र एका पुजाऱ्यासोबत या बुलेटच्या पुजेची तयारी करत होते. पण तितक्यात अनर्थ घडला. नव्या कोऱ्या बुलेटला आग लागली. त्यामुळे रामचंद्र यांच्या डोळ्यात अश्रू आले. बुलेटला आग लागल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली. आग विझवण्याचा प्रयत्न करत असातनाच अचानक या बुलेटचा स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की बॉम्बचा स्फोट झाल्याचा भास लोकांना झाला. या झालेल्या स्फोटामुळे लोक जागा मिळेल तिकडे पळत सुटले. याचा व्हीडिओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होतोय. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही.
आतापर्यंत आतापर्यंत आपण अनेक चारचाकी गाड्यांना, इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या घटना पाहिल्या आहेत. पण बुलेटला लागलेली आग ही दुर्मिळ घटना आहे. आंध्र प्रदेशमध्ये एका नव्या कोऱ्या बुलेटला भीषण आग लागली. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.
संबंधित बातम्या