Video : बघता बघता बुलेट पेटली, व्हीडिओ पाहून म्हणाल, “लाखाचे बारा हजार झाले!”
हा व्हीडीओ shivamudhiraj7640 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून गाड्यांना आग लागल्याचे व्हीडिओ पाहायला मिळत आहेत. बुलेटला आग लागल्याचेही व्हीडिओ समोर आले. आताही असाच एक व्हीडिओ समोर आलाय. ज्यात एका बुलेटला आग लागल्याचं पाहायला मिळत आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बुलेटला अचानक आग लागल्याची ही घटना आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या या बुलेटमधून अचानक धुर निघायला लागतो. अन् ही गाडी पेट घेते. या घटनेचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
व्हायरल व्हीडिओ
सध्या एक व्हीडिओ व्हायरल होतोय. रस्त्याच्या बाजूला एक बुलेट उभी आहे. सुरूवातीला या बुलेटमधून धूर येऊ लागतो. पुढच्या काही क्षणात ही बुलेट पेट घेते. इथे काही लोक ही घटना पाहताना दिसत आहेत. मात्र कुणीही ही आग विझवण्यासाठी पुढे येताना दिसत नाही.बुलेटला आग नक्की कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतू हा व्हीडीओ पाहून अनेक बुलेट प्रेमींच्या काळजात धस्स होतंय. चांगली बाब इतकीच की ही घटना घडली तेव्हा या बुलेटवर त्यावेळी कुणी बसलेलं नव्हतं. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
View this post on Instagram
हा व्हीडीओ shivamudhiraj7640 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हीडीओला 1.3 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. तर 84 हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हीडीओला लाईक केलंय.
अशीच आग लागल्याची घटना घडली होती. उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील समता नगरमध्ये हा प्रकार घडला. शेजारीच लागलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुचाकीला आग लागण्याचा थराराक प्रकार कैद झाला. राजेश गुप्ता समता नगरमध्ये राहायला आहेत. शनिवारी दुपारी राजेश गुप्ता हे यांच्या बुलेट मोटरसायकलवर बसले होते. अचानक बुलेटमधून धूर येऊ लागला. त्यामुळे गुप्ता यांनी गाडी तशीच सोडली आणि बाजूला झाले.वेळीच बुलेटवरुन उतरल्यामुळे राजेश गुप्ता यांचा जीव थोडक्यात वाचलाय. कारण गाडी सोडताच बुलेटमधून त्यानंतर काही क्षणातच त्यांच्या गाडीने पेट घेतला. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी पाणी, रेती, माती, फायर एक्सटिंग्विशरच्या साहाय्याने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटपर्यंत ही आग विझली नाही. त्यामुळे संपूर्ण गाडी जळून खाक झाली. यात राजेश गुप्ता यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. पण सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही.