फेसबूकच्या पेरेंट कंपनीला मोठा झटका मिळालाय. रशियाकडून META ला दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकण्यात आलंय. मार्च महिन्यात युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाने देशात फेसबुक तसेच ट्विटर आणि यूट्यूब ब्लॉक केले होते. रशिया युक्रेनशी युद्धात गुंतलाय. अशा परिस्थितीत फेसबुकच्या मूळ कंपनीचा या यादीत समावेश करणं हा टेक कंपनीसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे रशियाने ‘टेररिस्ट अँड जहाल’ संघटनांच्या यादीत ‘मेटा’चा (Facebook Parent Company) समावेश केला आहे.
हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रशियन मीडिया कंपन्यांसोबत भेदभाव करत असल्याचा आरोप या काळात या देशाने केला होता.
फेसबुकने या प्रकरणात तेव्हा म्हटलं होतं की, रशियाने हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ब्लॉक करून लाखो लोकांना विश्वासार्ह माहितीपासून वंचित ठेवले आहे.
रशियन सरकारची सेन्सॉरशिप एजन्सी रोस्कोमनॅड्झर (Roskomnadzor) यांनी म्हटले होते की, ऑक्टोबर 2020 पासून फेसबुककडून रशियन मीडियाविरुद्ध भेदभावाची एकूण 26 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
रशियाच्या आरटी आणि आरआयए या वृत्तसंस्थांवर सरकारपुरस्कृत वाहिन्यांच्या खात्यांची पोहोच कमी केल्याचा आरोप रशियाच्या सरकारने केला होता.