Shocking video viral : केवळ अमानवी..! रशियन रणगाडा युक्रेनियन कारवर घुसला आणि…
Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेन यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. युक्रेनची राजधानी कीवच्या (Kyiv) रस्त्यांवर हे युद्ध सुरू आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी रशिया हल्ला (Attack) करू शकतो, असा इशारा यापूर्वीच दिला होता.
Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेन यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियन सैन्याने युक्रेनच्या अनेक भागात हल्ले करून लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. दरम्यान, युक्रेनची राजधानी कीवच्या (Kyiv) रस्त्यांवर हे युद्ध सुरू आहे. प्रशासनाने लोकांना घरातच राहण्याचा इशारा दिला आहे, खिडकीतून डोकावण्याची किंवा बाल्कनीतून बाहेर पाहण्याची चूक करू नका. यापूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी राजधानी कीववर रशिया हल्ला (Attack) करू शकतो, असा इशारा यापूर्वीच दिला होता. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या या युद्धात शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इकडे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानेही दावा केला आहे, की या युद्धात आतापर्यंत 1000हून अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत. या युद्धाशी संबंधित एक अतिशय भयानक व्हिडिओही व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल.
रशियाचा रणगाडा
व्हिडिओमध्ये तुम्ही रस्त्यावरून जात असलेल्या एका रणगाड्याखाली एक कार कशी येते ते दिसत आहे. हा रणगाडा आपला मार्ग अचानक बदलून कसा कारला धडकतो, ते या व्हिडिओत दिसत आहे. या रणगाड्याखाली आल्यानंतर त्या कारचा चेंदामेंदा झाला असणार. या कारमध्ये किती लोक बसले होते, याची माहिती मिळू शकलेली नाही, मात्र गाडीत बसलेल्या सर्वच जणांना आपला जीव गमवावा लागला असावा, असे खात्रीने म्हणता येईल. कारला पायदळी तुडवणारा हा रणगाडा रशियाचा होता, जो युक्रेनच्या रस्त्यांवर फिरत होता.
ट्विटरवर शेअर
हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @JasonHanifin या आयडी नावाने शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की हे एक धक्कादायक दृश्य आहे, ज्यामध्ये एक गाडी अचानक आपला मार्ग बदलते आणि कारच्या वर चढते. अवघ्या 25 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 7 मिलियनपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला आहे, तर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अमानवी कृत्य
काही यूझर्सनी या घटनेचे वर्णन रशियन सैन्याचे अमानवी कृत्य असे केले आहे. त्याचवेळी, व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कमेंटमध्ये सांगितले आहे, की या अपघातात कार चालवणाऱ्या ड्रायव्हरचे प्राण चमत्कारिकरित्या वाचले आहेत.
Shocking! A tank CHANGES direction to drive over a car! #RussiaUkraineWarpic.twitter.com/i9g0YiJRuV
— Jason Hanifin (@JasonHanifin) February 25, 2022