Inspirational video viral : ‘या’ तरुणानं ठरवलंय, सैन्यात भरती व्हायचं आणि देशासाठी काहीतरी करायचं!

Salute to Indian Army : भारतीय सैन्याच्या शौर्यकथा आपण ऐकत असतो. सैनिक आपले कर्तव्य चोखपणे बजावत असतात. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ आपण पाहतही असतो. एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) झाला असून यातून भारतीय सैन्याविषयीचा (Army) आदर दर्शवण्यात आलाय.

Inspirational video viral : 'या' तरुणानं ठरवलंय, सैन्यात भरती व्हायचं आणि देशासाठी काहीतरी करायचं!
सैन्याच भरती होण्यासाठी कठोर मेहनतीचा तरुणाकडून संदेशImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 8:30 AM

Salute to Indian Army : भारतीय सैन्य आणि त्याच्या शौर्याच्या अनेक कथा आपण ऐकत असतो. थंडी असो, की ऊन अथवा पाऊस… सैनिक आपले कर्तव्य अत्यंत चोखपणे बजावत असतात. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ आपण पाहतही असतो. आपल्या सैन्याविषयी प्रत्येक भारतीयाच्या मनात आदरभाव आहे. हाच आदरभाव विविध कार्यांतून दिसून येत असतो. त्यासंबंधीचे व्हिडिओही व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) झाला असून यातून भारतीय सैन्याविषयीचा (Army) आदर दर्शवण्यात आलाय. अनेक तरूण सैन्यात भरती होण्यासाठी कठोर मेहनत घेतात. हे करत असताना ते सर्व काही विसरतात. कारण लक्ष्य एकच असते ते म्हणजे सैन्यात भरती होणे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरूण असेच मेहनत घेणारा दाखवलाय. पण त्याच्यासोबत काय घडते, हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे.

आर्मीत भरती होण्याचा पण…

व्हिडिओमध्ये एक तरूण आर्मीत भरती होण्यासाठी ट्रेनिंग घेत असतो. त्यातच त्याचे मित्र त्याला पार्टीसाठी आग्रह धरतात. तो आपल्या सैन्यातल्या भावाला फोन करून पैसे मागवतो. भाऊ पैसे तर पाठवतो. मात्र त्याला ताकीद देतो, की आर्मीचे ट्रेनिंग महत्त्वाचे आहे. लवकरच भरती होणार आहे. भावाकडून पैसे मिळाल्यावर तो मित्रांकडे आनंदाने जातो. पण तिथे लगेच त्याला फोन येतो, की त्याला कमांडर भाऊ शहीद झाला. त्याला खूप वाईट वाटते. त्याचक्षणी तोही ठरवतो, की देशासाठी काहीतरी करायचे!

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर हा व्हिडिओ अल्टिमेट जावेद (Ultimate Javed) या चॅनेलवरून अपलोड करण्यात आलाय. ‘salute to Indian Army’ अशी कॅप्शन देण्यात आलीय. 26 फेब्रुवारीला हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. यूझर्सना हा व्हिडिओ आवडला. तो आता व्हायरल होतोय. तीन दिवसातच 3.4 मिलियनहून अधिक व्ह्यूज त्याला मिळाले आहेत. त्यात वाढच होतेय. या व्हिडिओवर विविध कमेंट्सही दिसून येत आहेत. (Video courtesy – Ultimate Javed)

आणखी वाचा :

…अन् CISF जवानानं ‘असा’ वाचवला चिमुरडीचा जीव! लोक म्हणतायत, हेच खरे ‘हिरो’; Metro video viral

विनाशकारी युद्धादरम्यान Viral झाला युक्रेनियन महिलेचा ‘हा’ Video, काय सांगतेय ती? ऐका

Viral : कॉमेडियनही आणि डान्सच्या रियालिटी शोचे विजेतेही, Volodymyr Zelenskyy यांचा ‘हा’ Dance video पाहिला का?

'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.