Bhiwandi Video: मुंबईजवळ असेलल्या भिवंडीतील भयान वास्तव! मुलांच्या शिक्षणासाठी स्वत: होडी चालवणाऱ्या कांताला सलाम
भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायत हद्दीतील पलाट पाडा या गावात अत्यंत दुरवस्था आहे. या गावात शासनाची कोणतीही व्यवस्था नाही. उसगांव तलावाच्या किनाऱ्यावर असलेला हा पाडा अनेक समस्यांनी ग्रासला आहे .परंतु याच डॅम मधून दररोज वसई विरार महानगरपालिकेला 20 एम एल टी पाणी पुरवठा करून तहान भागवत असताना या पाड्यावर नळ पाणी पुरवठा योजना नाही .ना वीज आहे ना रस्ता ,त्यामुळे येथील जंगलातील कच्ची पायवाट पावसाळ्यात बंद होते ,तेथील ओढ्याला सुध्दा पाणी वाढत असल्याने नावेतून प्रवास करून उसगाव या पलीकडे अर्धा तसाच नावेतून प्रवास करून यावे लागते.त्यामुळे या पाड्यावर असणाऱ्या 30 घरातील सुमारे 35 ते 40 विद्यार्थी यांचे शिक्षणासाठी उसगाव अथवा वज्रेश्वरी येथे जाण्यासाठी नावेचा वापर करावा लागतो .
मुंबई : मंत्रालया पासून 79 किमी अंतरावर तर ठाणे जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 49 किमी अंतरावर भिवंडी(Bhiwandi) वसई तालुक्याच्या सीमेवरील गणेशपुरी ग्रामपंचायती मध्ये समाविष्ट असलेला ऊसगाव डॅम नजीकचा पलाट पाडा आज ही वीज रास्ता पाणी या मूलभूत सोयीं पासून कोसो दूर आहे. या आदिवासी पाड्यातील मुलांचे शिक्षण अडचणीत येऊ नये यासाठी याच पाण्यामुळे शिक्षण अर्धवट राहिलेल्या कांता चिंतामण बरफ ही मुलगी मागील दोन वर्षां पासून शालेय मुलांना सकाळ संध्याकाळ शाळेत घेवुन जाण्या साठी नावेचे सारथ्य करीत आहे .
भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायत हद्दीतील पलाट पाडा या गावात अत्यंत दुरवस्था आहे. या गावात शासनाची कोणतीही व्यवस्था नाही. उसगांव तलावाच्या किनाऱ्यावर असलेला हा पाडा अनेक समस्यांनी ग्रासला आहे .परंतु याच डॅम मधून दररोज वसई विरार महानगरपालिकेला 20 एम एल टी पाणी पुरवठा करून तहान भागवत असताना या पाड्यावर नळ पाणी पुरवठा योजना नाही .ना वीज आहे ना रस्ता ,त्यामुळे येथील जंगलातील कच्ची पायवाट पावसाळ्यात बंद होते ,तेथील ओढ्याला सुध्दा पाणी वाढत असल्याने नावेतून प्रवास करून उसगाव या पलीकडे अर्धा तसाच नावेतून प्रवास करून यावे लागते.त्यामुळे या पाड्यावर असणाऱ्या 30 घरातील सुमारे 35 ते 40 विद्यार्थी यांचे शिक्षणासाठी उसगाव अथवा वज्रेश्वरी येथे जाण्यासाठी नावेचा वापर करावा लागतो .
परंतु घरातील व्यक्ती शेतावर कामावर गेल्याने नाव चालवायला कोणी नसल्याने बऱ्याच वेळा शाळा विद्यार्थ्यांची बुडत असे. अशीच कथा कांता हिच्या वाट्याला आली व त्यातच तिने या अडथळ्यांना कंटाळून शाळा नववी मध्ये सोडली. परंतु यामधून आलेले नैराश्य कांताला शांत बसू देत नव्हते त्यामुळे तिने मागील दोन वर्षां पासून आपल्या पाड्यातील लहानग्या मुलांची शाळा नाव चालवायला कोणी नाही म्हणून बुडू नये या साठी कांता ने पुढाकार घेत या मुलांना दररोज शाळेत जाण्यासाठी व सायंकाळी घरी येताना नावेचे सारथ्य करण्याचा निर्णय घेतला .त्यातून या मुलांचे शिक्षण अर्धवट राहणार नाही हा विश्वास कांताने व्यक्त केला आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर उत्साहात साजरा केला जात असताना मुंबई या राजधानी च्या शहरापासून 79 किमी तर ठाणे जिल्ह्या कार्यालयापासून 49 किमी अंतरावर असलेल्या पलाट पाडा नागरी सुविधां पासून वंचित असल्याची चिंता श्रमजीवी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार यांनी केली आहे .या गावातील नागरिक मतदान करतात ,पण मग त्यांना नागरी आरोग्य सुविधां पासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना वंचित ठेवले जात असल्याचे वास्तव मांडले .तर हार घर झेंडा ही संकल्पना राबविली जात असताना ज्या घरात वीज नाही नळाचे पाणी नाही ,रस्ता नाही त्या घरांवर झेंडा फडकणारच कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे .