बरमोडा घालून बँकेत आल्याने SBI ने खातेदाराला बाहेर काढलं, नेटकरी म्हणाले, कसलेही नियम घालणाऱ्या SBI मधील खाती बंद करा!
एका व्यक्तीने असा दावा केला आहे की त्याने फक्त शॉर्ट्स घातल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखेतून परत पाठवण्यात आलं. तक्रारदाराचे असेही म्हणणे आहे की, त्याला बँकेत येण्यासाठी पूर्ण पँटमध्ये येण्यास सांगितले
इंटरनेटच्या जगात, लोकांमध्ये दररोज एक ना एक मुद्दा चर्चेचा विषय बनतो. तुम्हाला आठवत असेल की, काही महिन्यांपूर्वी एका महिलेला साडीत असल्याने रेस्टॉरंटमध्ये प्रवेश न मिळाल्याचे प्रकरण समोर आले होते, त्यानंतर बराच गदारोळ झाला होता आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. आता याशी संबंधित एक प्रकरण कोलकाता येथून समोर आले आहे ज्यात एका व्यक्तीने असा दावा केला आहे की त्याने केवळ शॉर्ट्स घातल्यामुळे बँकेत प्रवेश केला नाही.
हे प्रकरण पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आहे, जिथं एका व्यक्तीने असा दावा केला आहे की त्याने फक्त शॉर्ट्स घातल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखेतून परत पाठवण्यात आलं. तक्रारदाराचे असेही म्हणणे आहे की, त्याला बँकेत येण्यासाठी पूर्ण पँटमध्ये येण्यास सांगितले आणि शाखेला आपल्या ग्राहकांकडून ‘शालीनतेची’ अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले होते.
Hey @TheOfficialSBI went to one of your branch today wearing shorts, was told that I need to come back wearing full pants as the branch expects customers to “maintain decency”
Is there some sort of an official policy on what a customer can wear and cannot wear?
— Ashish (@ajzone008) November 16, 2021
हे ट्विट 16 नोव्हेंबरला केले होते, जे व्हायरल होत आहे. यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी यासाठी बँकेची क्लास लावली तर काहींनी तक्रारदाराला पूर्ण कपडे घालून बँकेत जाण्याचा सल्ला दिला आहे.
— Scoot (@Scoote_rr) November 17, 2021
I too have faced some sort of same problem.
— Lord of Thunder?️ (@LokiKaBhaiThor) November 18, 2021
We citizens should follow some decency in going to Bank branches and other public places. It us not like going to a chai shop or mithaiwala. Let him enter a Citibank branch with shorts and a T shirt. The youngsters of gen next has no value ethics now .
— Srinivasan Ramaswamy (@vasane53) November 18, 2021
एका यूजरने रिट्विट करताना लिहिले की, “तुमचे एसबीआयमधील खाते बंद करा, इतर कोणत्याही बँकेत खाते उघडा.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, ‘कोणत्याही शाखेत इतर ग्राहकांसाठी कोणतीही विचित्र परिस्थिती उद्भवू नये, यासाठी लोकांनी त्यांच्या कपड्यांची काळजी घेतली पाहिजे.
हेही पाहा:
चिमुरडीचा डोकं चक्रावणारा स्टंट, 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलेला जबरदस्त Video
Viral: घरात घुसला, सायकल उचलली, आणि धूम ठोकली, लोक म्हणाले, याला म्हणतात भुरटा चोर!