व्याकरण लक्षात ठेवायची यापेक्षा चांगली आयडिया असूच शकत नाही, सरकारी शाळेतील विद्यार्थी व्हायरल!
मराठी, हिंदी व्याकरण तर सगळ्यात जड. एकवेळ ते इंग्लिश तरी लक्षात राहायचं. भाषेच्या पेपरला गुण कमी व्हायचे ते व्याकरणामुळेच! कलेचा वापर आपण शालेय अभ्यासात का नाही करू शकत?
शाळेत असताना गोष्टी लक्षात ठेवायला भयानक अडचण यायची. गोष्टी पाठ कराव्या लागायच्या. व्याकरणासोबत तर 36 चा आकडा असायचा. सगळ्यात जड काय जात असेल पाठांतराला तर ते व्याकरण. मराठी, हिंदी व्याकरण तर सगळ्यात जड. एकवेळ ते इंग्लिश तरी लक्षात राहायचं. भाषेच्या पेपरला गुण कमी व्हायचे ते व्याकरणामुळेच! कलेचा वापर आपण शालेय अभ्यासात का नाही करू शकत? एखादी कविता, नाटक, चित्रकला या सगळ्याचा वापर करून अभ्यास का नाही होऊ शकत? पिरियॉडिक टेबल पाठ करताना त्याचा रॅप का नाही होऊ शकत? आपण कलेला अभ्यासाच्या तुलनेत फार कमी समजतो. खरं तर या दोन गोष्टी हातातहात घालून व्यवस्थित आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकतात. हे अंमलात आणणं फार काही अवघड नाही. हा व्हायरल व्हिडीओ हे दाखवून देतो.
व्हिडीओ शेअर केलाय आयएएस अर्पित वर्मा यांनी! या व्हिडिओत शाळेचे विद्यार्थी हिंदी व्याकरणाविषयी सांगतायत. गाण्याच्या माध्यमातून ते हिंदी व्याकरण स्वतः समजून घेतायत आणि आपल्यालाही समजावून सांगतायत.
नाम, सर्वनाम, विशेषण, संज्ञा हे सगळं काय असतं हे सांगणारा हा व्हिडीओ आहे. चाल लावून हे सांगितलं जातंय. व्याकरण शिकण्यासाठी ही खरं तर उत्तम कल्पना आहे.
“अद्भुत! शाळेतील विद्यार्थी कविता आणि नाटकाच्या माध्यमातून हिंदी व्याकरण कसं शिकतायत बघा…!” असं कॅप्शन देत आयएएस अर्पित वर्मा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केलाय.
व्हिडीओ
अद्भुत..!!
स्कूली विद्यार्थी कविता एवं नाटक के माध्यम से हिंदी व्याकरण कैसे सीख रहे हैं, आप भी देखिए..!! pic.twitter.com/9cjeq3MroK
— Arpit Verma IAS (@arpit_verma13) September 19, 2022
हे विद्यार्थी सरकारी शाळांचे विद्यार्थी असल्याचं दिसून येतंय. नाचत, गात, चाल लावत विद्यार्थी हिंदी व्याकरणातील व्याख्या बोलून दाखवतायत.
“वंदे मातरम” चं तुम्ही चाल लावलेलं गाणं ऐकलंय का? हे तेच गाणं आहे. नीट ऐकलं तर कळून येतं. जस जसं मुलं व्याकरणाचं गाणं सुरु करतात. टाळ्या वाजवायला सुरु करतात. त्यांची शिक्षिका हा व्हिडीओ शूट करतीये.
अशा पद्धतीने गाण्याचा वापर करणं आणि तेही इतक्या अवघड गोष्टीसाठी ही अतिशय उत्तम कल्पना आहे. तुम्हालाही व्हिडीओ बघून, “आपल्यालाही शाळेत असं का शिकवलं गेलं नाही?” असा प्रश्न नक्की पडेल.