“गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः” प्राचार्य असावेत तर असे! विद्यार्थ्यांनी स्वतः व्हिडीओ काढला, व्हायरल केला
अनेक निर्णय खास विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेत. खासगी गाड्यांनी प्रवास करताना त्यांना सवलत देण्यात आलीये.
देशभरातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. लॉकडाऊन मध्ये तर विद्यार्थ्यांचे फार हाल झालेत. विद्यार्थ्यांचं प्रवासाचं भाडं हा एक वेगळा मुद्दा आहे. कधी त्यांना चालत जावं लागतं, कधी सायकल, कधी बस. शाळेची बस असेल तर ठीक. खासगी गाडीने प्रवास असेल तर प्रचंड हाल. अनेक निर्णय खास विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेत. खासगी गाड्यांनी प्रवास करताना त्यांना सवलत देण्यात आलीये. पण त्यांना सवलत असल्याने उलट त्यांना खासगी गाड्या प्रवेश देत नसल्याच्या अनेक घटना घडल्यात. अशा अनेक तक्रारी रोज समोर येत आहेत. हा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात खुद्द शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना मदत करताना दिसून आलेत.
केरळच्या मलप्पुरममध्ये एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेजवळ बस थांबत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर एका खासगी बससमोर उभे राहण्याचा निर्णय घेतला.
आता बससमोर उभे राहून चालकाशी वाद घालणाऱ्या या मुख्याध्यापकाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या मुख्याध्यापकांना चांगलीच वाह वाह मिळतीये.
व्हिडीओ व्हायरल
विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेजवळ बस थांबत नाही अशा अनेक तक्रारी केल्या. शेवटी मुख्याध्यापकांनीच यावर तोडगा काढायचं ठरवलं.
मलप्पुरम जिल्ह्यातील पेरिंथलमन्नाजवळील पीटीएम हायर सेकंडरी स्कूल नावाची ही शाळा. मुख्याध्यापकांचं नाव डॉ. साकेर आहे. हे राज्य प्राचार्यांच्या संघटनेचे अध्यक्षही आहेत.
कोझिकोड पलक्कड मार्गावर धावणारी “राजप्रभा” नावाची खासगी बस बस स्थानकावर थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत असल्याच्या तक्रारी होत्या.
साकेर यांनी यापूर्वीही बस थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. प्रेक्षकांनी टिपलेला हा व्हिडिओ सोशल मीडियाने प्राचार्यांचे कौतुक करत व्हायरल केला आहे. बॅकग्राऊंडमध्ये जोरदार टाळ्याही ऐकू येतात.