General Knowledge Quiz: कोणता प्राणी जन्माला येताच स्वतःच्या आईला खातो?
General Knowledge Quiz: स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी... असं आपण म्हणतो... मुलांसोबत आईचं नातं फार भावूक असतं..., पण एक असा प्राणी आहे जो जन्माला येताच स्वतःच्या आईला खातो...,

General Knowledge Quiz: सामान्य ज्ञान म्हणजेच GK म्हणजे वेगवेगळ्या विषयांची सामान्य माहिती. त्यात इतिहास, भूगोल, विज्ञान, कला, साहित्य, चालू घडामोडी अशा गोष्टींचा समावेश होतो. सामान्य ज्ञान असल्यामुळे जग आणि आजू-बाजूच्या गोष्टी जाणून घेण्यास मोठी मदत होते. शिवाय स्पर्धा परीक्षांमध्ये देखील सामान्य ज्ञानाचा फार मोठा फायदा होतो. सामान्य ज्ञान वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत.
तुम्ही वर्तमानपत्रे, मासिके वाचू शकता आणि दररोज ऑनलाइन लेख देखील वाचू शकता. पुस्तके आणि ब्लॉग वाचणे हा देखील एक चांगला मार्ग आहे. याशिवाय, प्रश्नमंजुषा खेळणे आणि कोडी सोडवणे देखील मदत करते. आज आम्ही तुम्हाला सामान्य ज्ञानाचे काही मनोरंजक प्रश्न आणि त्यांची उत्तरे सांगणार आहोत…
स्वतःच्याच आईला खातो ‘हा’ प्राणी
असा एक प्राणी आहे जे जन्माला आल्यानंतर आईला खातो. ऐकून तुम्हाला देखील विचित्र वाटलं आसेल. पण हा निसर्गाचा एक विचित्र पैलू आहे. सर्वत्र आपण पाहतो की, आई आणि मूल यांच्यात प्रेम असते, एक भावनिक नातं असतं. परंतु काही जीवांच्या जगात असं घडत नाही. चला जाणून घेऊया या रहस्यमय प्राण्याबद्दल.
जर तुम्ही सापाबद्दल विचार करत असाल तर तुमचा अंदाज चुकीचा आहे. हा प्राणी आपल्या घरांच्या आसपास देखील आढळतो आणि अत्यंत विषारी आहे. त्याचा आकार लहान असला तरी त्याचा स्वभाव अतिशय धोकादायक आहे. तो कोणता प्राणी आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता का?
सध्या ज्या प्राण्याची चर्चा होत आहे, तो प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून विंचू आहे. विंचू अनेकदा अंधार आणि ओलसर ठिकाणी लपतात आणि त्यांचं विष अत्यंत धोकादायक असू शकतं. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही प्रजातींचे विंचू त्यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या आईला खातात. हे निसर्गाचे एक अनोखे आणि क्रूर सत्य आहे, जे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते.
मादी विंचू एका वेळी तब्बल 100 विंचूंना जन्म देते आणि सर्व पिलांना स्वतःच्या पाठीवर ठेवते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे छोटे विंचू आपल्याच आईचे मांस खाऊन जगतात. अखेर आई मरेपर्यंत हा क्रम चालू राहतो. निसर्गाचा हा क्रूर नियम ऐकून तुम्हाला देखील धक्का बसला असेल…