असं घडलंय का? मासा खायला गेल्यावर तो अचानक जिवंत झालाय का? VIDEO
एका रेस्टॉरंटमध्ये हिरव्या ईल गोबीचा पहिला अनुभव सांगितला. लिंबू, काही नूडल्स आणि भाज्यांचे तुकडे असलेल्या प्लेटमध्ये ईल सर्व्ह केले गेले.
रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्लेटमधील आपलं जेवण अचानक जिवंत झालं तर? किती विचित्र असेल? जपानमधील एका रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला आणि आता ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका रेस्टॉरंटमध्ये प्लेटमधला मासा जिवंत होऊन ग्राहकाची चॉपस्टिक खाताना दिसतो. ही क्लिप पुन्हा एकदा इंटरनेटवर बरीच पाहायला मिळत असून लोक त्यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ गेल्या वर्षी एका इन्स्टाग्राम युजरने पोस्ट केला होता. जपानमधील टोयोकावा येथील वारासुबो नावाच्या व्यक्तीने एका रेस्टॉरंटमध्ये हिरव्या ईल गोबीचा पहिला अनुभव सांगितला. लिंबू, काही नूडल्स आणि भाज्यांचे तुकडे असलेल्या प्लेटमध्ये ईल सर्व्ह केले गेले.
व्हिडिओमध्ये ग्राहक आपल्या चॉपस्टिने डिश खाण्यासाठी पुढे जात असताना मासा तोंड उघडतो आणि चॉपस्टिक खाण्याचा प्रयत्न करतो. हा मासा अचानक जिवंत होतो.
क्लिप पाहिल्यानंतर लोक भानावर आले. हे कसं होऊ शकतं असा प्रश्न लोकांना पडला होता, पण ट्विटर पेजने शेअर केलेला हा व्हिडिओ अगदी खरा आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
Fish served at restaurant bites chopstick? pic.twitter.com/PnkG6xt1Ig
— OddIy Terrifying (@OTerrifying) February 13, 2023
या व्हिडिओच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह केले जाणारे मासे चॉपस्टिक चावतात’ व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, मी असे काही ऑर्डर करू शकत नाही. मी 20 वर्षांहून अधिक काळ या व्यवसायात आहे, परंतु यापूर्वी असे कधीही पाहिले नाही. हे अधिक धोकादायक आहे. तुमचे जेवण व्यवस्थित शिजले आहे याची खात्री करा.”