मोजता मोजता विसरून जाल किती जण बसलेत, इतके लोक दुचाकीवर!
प्रत्येकजण एकमेकांना घट्ट पकडून समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. दुचाकी चालवणारी व्यक्ती गाडीचा वेग कमी जास्त न करता एकाच स्पीड ने गाडी चालवत आहे.
केवळ भारतातच नाही तर आता जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना जुगाड खूप आवडतो. कोणतेही काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी किंवा महागड्या वस्तू स्वस्तात करण्यासाठी ते जुगाडचा वापर करतात. मात्र, काही लोक असे असतात जे जुगाड करता करता आपला जीव धोक्यात घालतात आणि नंतर पश्चाताप करतात. भारतात बाईक चालवण्यासाठी कायदे आहेत. बाईकवर फक्त दोन लोकांना बसण्याची परवानगी आहे. तसेच दोघांनाही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. मात्र छोट्या शहरांमध्ये कायद्याकडे कोणीही लक्ष देत नाही.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सुमारे 10 जण दुचाकीवर बसले आहेत. इतकंच नाही तर बाईक चालवणारी व्यक्ती सगळ्यांचा समतोल साधून भरधाव वेगाने रस्त्यावर गाडी चालवत आहे.
हा भारताबाहेरील दुसऱ्या देशाचा व्हिडिओ असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर दुचाकी आणि कार चालवणारे लोकही त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले आणि मग त्यांनी त्यांच्या मोबाइलवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. भारतात असे काही लोक आहेत जे कायदा माहित असूनसुद्धा अशा गोष्टी करतात.
व्हिडिओनीट बघितला तर कळतं ही बाईक होंडा कंपनीची असून दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीच्या समोर दोन, मागे चार आणि वर तीन जण बसलेले असल्याचे दिसून येते.
प्रत्येकजण एकमेकांना घट्ट पकडून समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे. दुचाकी चालवणारी व्यक्ती गाडीचा वेग कमी जास्त न करता एकाच स्पीड ने गाडी चालवत आहे.
नील पटेल नावाच्या चॅनेलवर हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओला 80 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.