तिसरीतील मुलीने मोदींना पाठवला व्हिडिओ, अधिकाऱ्यांची हवा झाली टाइट, मग काय झाले पाहाच
Seerat Naaz : जम्मू-काश्मीरमधील सीरत नाज ही आठ वर्षांच्या मुलीने केलेला व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. तिने सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक व्हिडिओ व्हायरल केला. मग त्यानंतर अधिकारी सरळ शाळेत आले. तिला आएएस अधिकारी व्हायचंय आहे.
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील सीरत नाज ही तिसरीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी चर्चेत आली आहे. सीरतने तिच्या शाळेच्या दुर्दशेबाबत सरळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक व्हिडिओ व्हायरल केला. तिच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियातमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली. पाहता, पाहता हा व्हिडिओ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचला. मग अधिकारी सरळ शाळेत आले. सीरतने तिच्या शाळेची परिस्थिती या व्हिडिओमध्ये सांगतील. त्यानंतर अधिकाऱ्यांची हवा टाईट झालीय. माध्यमांचे लक्ष सीरत हिच्या व्हिडिओकडे गेले. तिची मुलाखत प्रसारीत झाली.
#Watch: An adorable video of a little girl from #JammuAndKashmir named Seerat Naaz requesting PM #Modi, the holder of the country’s most powerful office, to build a nice school for them has the internet’s heart.@AdityaRajKaul @AartiTikoo @amritabhinder @dna pic.twitter.com/zaCydLm4qc
हे सुद्धा वाचा— Koshal Dar (@DarKoshal) April 15, 2023
काय केले सीरतने
सीरत हिने तिच्या तीन खोल्यांच्या सरकारी शाळेची दुरवस्था एक व्हिडिओमधून मांडली. यामध्ये ती म्हणते सुरवातील म्हणते, मोदी जी आप सबकी बात सुनते हो, मेरी भी बात सुन लो. देखो हमारा फर्श कितना गंदा हो गया है. हमें यहां नीचे बिठाते हैं. डेस्क भी नहीं है. शेवटी ती म्हणचे “कृपया मोदीजी, आमच्यासाठी एक चांगली शाळा बनवा, ना?”
काय आहे व्हिडिओमध्ये
व्हिडिओमध्ये शाळेची एक दुमजली इमारत दिसत आहे. तिची दुरवस्था झाली आहे. ती पाहता शाळा अर्धवट अवस्थेत बांधून सोडून दिल्याचे दिसते. मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि काही दिवसांनी जम्मूचे शालेय शिक्षण संचालक रविशंकर शर्मा यांनी शाळेत आले आणि काम सुरु झाले.
शाळेचे काम सुरु झाल्यानंतर दुसरा व्हिडिओमध्ये सीरत म्हणते, मोदी सरांनी यांना पाठवले. शाळेचे काम सुरु झाल्यामुळे मी खूप आनंदी आहे.
#WATCH via ANI Multimedia | Viral girl from Kathua in J&K, Seerat Naaz aspires to become IAS officerhttps://t.co/7EIGKFB9aK
— ANI (@ANI) April 18, 2023
शाळेत 250 मुले
या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सुमारे 250 मुले शिकतात. तत्कालीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या परिसराच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सांगण्यावरून 2013 ते 14 च्या दरम्यान इमारत बांधण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर 20 लाख रुपयेही दिले. 2017 मध्ये इमारतीसाठी पुन्हा 30 लाख रुपये देण्यात आले. 2017 मध्येच काम थांबले. आता पुन्हा काम सुरु झाले आहे. सीरतने IAS अधिकारी होण्याची महत्वकांक्षा व्यक्त केली.