Self Marriage: हे पाहा हे “मैं अपनी फेव्हरेट हूं!”,इतकी फेव्हरेट की स्वतःशीच लग्न करणार ही मुलगी…
काही लोकं हटके असतात. हे लोकं स्वतःच्या प्रेमात इतके बुडालेले असतात कि त्यांना कशाची म्हणजे अगदी जगातल्या कुणाचीही गरज नसते. हे ऐकताना, वाचताना विश्वास बसणार नाही पण जेव्हा तुम्ही गुजरातच्या या "सेल्फ लव्हस्टोरी" वर नजर टाकाल तर तुम्हाला नक्की विश्वास बसेल.
‘सेल्फ लव्ह’ (Self Love) नावाची एक गोष्ट असते. असं म्हटलं जातं कि दुसऱ्यावर प्रेम करण्याआधी स्वतःवर केलं पाहिजे. एकटंच फिरायला जाणं, एकटंच सिनेमा बघायला जाणं, हॉटेलात जाऊन खाणं हे आजच्या पिढीसाठी (Generation) खरंतर सेल्फ लव्ह! पण सेल्फ लव्ह हे आयुष्यभर पुरणारं नसतं. कधीतरी माणूस थकेलच की, कधीतरी कुणाची तरी गरज भासेलच की… अशा वेळी काय करणार? पण हे प्रश्न झाले आपले, सामान्यांचे! काही लोकं हटके (Unique) असतात. हे लोकं स्वतःच्या प्रेमात इतके बुडालेले असतात कि त्यांना कशाची म्हणजे अगदी जगातल्या कुणाचीही गरज नसते. हे ऐकताना, वाचताना विश्वास बसणार नाही पण जेव्हा तुम्ही गुजरातच्या या “सेल्फ लव्हस्टोरी” वर नजर टाकाल तर तुम्हाला नक्की विश्वास बसेल. “जानी…सेल्फ लव्ह में बहुत ताकत होती है!”
“मैं अपनी फेव्हरेट हूं!”
गोष्ट आहे गुजरातच्या क्षमा बिंदूची! क्षमा बिंदू “मैं अपनी फेव्हरेट हूं!” असं म्हणते. तिने ते सिद्ध पण केलंय बरं का! गुजरातची क्षमा11 जून २०२२ लग्न करणार आहे,तिचं लग्न सध्या चर्चेत आहे. वडोदरामध्ये राहणारी 24 वर्षीय क्षमा बिंदू स्वतःशीच लग्न करणार आहे. तिच्या या लग्नात सगळे रीतीरिवाज असतील, फेऱ्यांपासून ते पारंपरिक विधींपर्यंत, सगळे. याला गुजरातचा पहिला स्वयंविवाह किंवा एकल विवाह असं म्हटलं जातंय.
‘मला कधीच लग्न करायचं नव्हतं पण…’
या सेल्फ मॅरेजबद्दल क्षमा म्हणते, ‘मला कधीच लग्न करायचं नव्हतं, पण मला नवरी व्हायचं होतं.’ त्यामुळे मी स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. कदाचित माझ्या स्वत:च्या देशात मी सेल्फ लव्हचं उदाहरण देणारी पहिली मुलगी आहे.’ क्षमा एका खासगी कंपनीत काम करते. अशा प्रकारच्या विवाहाला लोकं अमान्य करू शकतात पण स्त्रियाही महत्त्वाच्या आहेत हेच मला ह्यातून सांगयचं आहे, असंही क्षमा म्हणते.
हनीमूनला गोव्याला जाणार
क्षमा बिंदूचे आई-वडीलही आपल्या मुलीच्या या निर्णयावर खूश आहेत. त्यांचीही या लग्नास मान्यता आहे या लग्नाला आशीर्वाद दिला आहे. क्षमाने आपल्या लग्नासाठी गोत्री येथील मंदिरात पाच व्रते लिहिली आहेत. लग्नानंतर क्षमाने हनीमूनसाठी गोव्याची निवड केली आहे, इथे ती दोन आठवडे राहणार आहे.