Viral: डोंगरकड्याच्या शेवटी बसून फोटो काढण्याचं वेड, दरीची खोली पाहून नेटकऱ्यांचा अंगावर काटा

व्हायरल व्हिडिओमध्ये एक माणूस डोंगरावर चालताना दिसत आहे. यानंतर, कॅमेराचा कोन बदलताच, एक विहंगम दृश्य दिसते. डोंगराखाली हजारो फूट खोल दरीच्या मध्यभागी एक शहर दिसते. हे दृश्यं खरोखरच हृदय पिळवटून टाकणारे आहे.

Viral: डोंगरकड्याच्या शेवटी बसून फोटो काढण्याचं वेड, दरीची खोली पाहून नेटकऱ्यांचा अंगावर काटा
पर्वताच्या कडेला उभा राहून फोटो
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 4:52 PM

भन्नाट सेल्फी आणि फोटो काढण्याच्या हव्यासापोटी काही लोक आपला जीव धोक्यात घालायलाही मागेपुढे पाहत नाहीत. अनेकवेळा असं करताना लोक दुर्घटनांनाही बळी पडलेले आहेत. असाच धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक माणूस टेकडीच्या अगदी टोकाला जाऊन त्याचा व्हिडिओ शूट करताना दिसत आहे. इथं एक चूक आणि या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. हा व्हिडिओ ब्राझीलचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याने हा व्हिडिओ पाहिला तो आश्चर्यचकित झाला. ( Selfy Video Of adventure Viral Shocking Video of a man on mountain making video of himself left netizens amazed)

व्हायरल व्हिडिओमध्ये एक माणूस डोंगरावर चालताना दिसत आहे. यानंतर, कॅमेराचा कोन बदलताच, एक विहंगम दृश्य दिसते. डोंगराखाली हजारो फूट खोल दरीच्या मध्यभागी एक शहर दिसते. हे दृश्यं खरोखरच हृदय पिळवटून टाकणारे आहे. अशा परिस्थितीत ही व्यक्ती न घाबरता डोंगराच्या टोकाला जाताना दिसत आहे. त्यानंतर तो जे काही करतो ते खरोखरच थक्क करणारे आहे. तो माणूस जाऊन डोंगराच्या शेवटी बसतो. इथे थोडीशी चूक त्याच्या जीवावर बेतू शकते.

चला तर मग आधी हा व्हिडिओ पाहूया.

हा धक्कादायक व्हिडिओ इंस्टाग्रामवर beautifulearth नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यासोबत युजरने कॅप्शन देताना लिहिले आहे की, ‘ब्राझीलमध्ये कोणीतरी इतके धाडसी आहे’. दोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला जवळपास 14 हजार लोकांनी लाईक केले आहे. सतत व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे. मात्र, बहुतांश युजर्स म्हणतात की, मूर्ख माणूसच असे मूर्खपणाचे कृत्य करेल. एका यूजरवर कमेंट करताना लिहिले की, ‘काही लोकांना काय प्रॉब्लेम असतो, माहीत नाही. एका चुकीने तो माणूस थेट हजारो फूट खोल दरीत कोसळला असता.

त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, मला वाटले की हा माणूस उडी मारणार आहे. हे मूर्खपणाचे आहे. अशा प्रकारे तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात का घालता? त्याचवेळी, ‘दुसऱ्या युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला.’ एकंदरीत हा व्हिडीओ ज्या कोणी पाहिला तो आश्चर्यचकित झाला.

हेही पाहा:

Video: छोटु चिंपांझीचं मुलांवर प्रेम, प्रत्येकाला कडकडून मिठी, व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक!

Video: वेनॉमचा मुखवटा घालून वडिल दरवाजामागे लपून बसले, पाहा समोर येताच मुलाचे काय हाल झाले!

 

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.