AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

video : अजगराला ‘किस’ करायला गेली मुलगी, मग जे घडले ते भयंकर..

एका अजगराला पाळीव समजून ती मुलगी तिचे चुंबन घ्यायला गेली. पण त्यानंतर क्षणाचीही उसंत न घेता या खतरनाक अजगराने झेप घेत त्या मुलीची अशी हालत केली की ते पाहून अंगावर काटा येईल.

video : अजगराला 'किस' करायला गेली मुलगी, मग जे घडले ते भयंकर..
Snake kissImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 3:21 PM

दिल्ली : सापाचे नाव ऐकूनच तुम्हा आम्हा सर्वांची पाचावर धारण बसते. साप दिसायला तर भयंकर दिसतातच पण त्यांच्या एका दंशाने मनुष्यप्राण्याचा जीव जाऊ शकतो. तरीही काही जण सापांशी मैत्री करायला जातात. परंतू सापासारख्या विषारी आणि खतरनाक प्राण्यापासून लांबच राहीलेले बरं…कारण त्याच्या जवळ जाणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रणच असते. एका महिलेने पाळीव अजगराला पाहून त्याला किस करायला गेली आणि जे भयंकर घडले ते पाहून पुन्हा कोणी असे धाडस करताना शंभर वेळा विचार करेल.

झडप घेऊन सापाने तोंडाचा चावा घेतला…

अंगावर काटा आणणारा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मुलगी स्वत: संकटाला आंमत्रण देताना दिसत आहे. या व्हिडीओ दोघा जणांनी एका अजगराला पकडलेले दिसत आहे. त्याचवेळी एक मुलगी तेथे येथे. आणि त्या अजगराचे प्रेमाने चुंबन घ्यायला जाते. परंतू दुसऱ्याच क्षणाला जे घडते ते पाहून तुमच्या काळजाचा थरकाप होईल.

हा पाहा व्हिडीओ..

मुलगी अजगरासारख्या खतरनाक जनावराला पाळीव समजून त्याचा ‘किस’ घेण्याचा प्रयत्न करायला जाते. परंतू दुसऱ्याच क्षणाला तो अजगरच तिच्या तोंडावर झडप घेत तिला चावतो. तिचे ओठच अजगर त्याच्या तीक्ष्ण दातांनी पकडल्याने मुलगी जीवाच्या आकांताने किंचाळते. मुलगी रडत ओरडत त्या अजगराच्या चाव्यापासून स्वत:ला वाचविण्याची दोघा हॅण्डलरांची मदत घेते. या व्हिडीओला ट्वीटरवर याच वर्षी 31 मे रोजी शेअर केले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 6.8 मिलियन लोकांनी पाहीले आहे. 29 हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. एका युजरने लिहीले आहे की मुली आठवणीत राहील असे चुंबन मिळाले आहे. दुसऱ्या एका युजरने लिहीलेय की कोण म्हणजे जनावरांना भावना नसतात. हा व्हिडीओ याचे जीते जागते उदाहरण आहे.

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...