Shocking Video : सापांसोबत म्यूझिक व्हिडीओ शूट करत होती गायिका, अचानक साप चावला!

हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण घाबरल्याशिवाय राहत नाही. अमेरिकी गायिका माइटाने स्वत: हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकुळ घातला असून तो जंगलातील वणव्याप्रमाणे पसरत आहे.

Shocking Video : सापांसोबत म्यूझिक व्हिडीओ शूट करत होती गायिका, अचानक साप चावला!
अमेरिका गायिका माइटाला साप चावला
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 1:20 PM

मुंबई : स्पर्धेच्या युगात लोक अशाप्रकारे आंधळे बनले आहेत की ते स्वत:चा जीव धोक्यात घालायलाही मागे पाहत नाहीत. अमेरिकी गायिकेबाबतही अशीच एक घटना घडली आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण घाबरल्याशिवाय राहत नाही. अमेरिकी गायिका (America Singer) माइटाने स्वत: हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकुळ घातला असून तो जंगलातील वणव्याप्रमाणे पसरत आहे.

21 वर्षाची अमेरिकी गायिका माइटाला आपल्या म्यूझिक व्हिडीओच्या शूटिंग दरम्यान एक धक्कादायक अनुभव आला. या व्हिडीओमध्ये माइटा सापांसोबत शूट करताना दिसून येत आहे. यावेळी सापाने तिच्या चेहऱ्यावर चावा घेतल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की माइटा एका पांढऱ्या बॅकड्रॉपवर झोपलेली पाहायला मिळतेय. तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. मायटाच्या अंगावर काळ्या रंगाचा एक साप वळवळताना दिसून येत आहे. यावेळी एक व्यक्ती पांढऱ्या रंगाचा साप माइटाच्या अंगावर ठेवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच काळ्या गंगाचा साप माइटाच्या चेहऱ्यावर चावा घेतो.

View this post on Instagram

A post shared by Maeta (@maetasworld)

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे माइटा किंचाळते!

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती माइटाच्या शरीरावर पांढऱ्या रंगाचा साप ठेवतो, तेव्हा काळा साप चवताळतो. त्यानंतर एका क्षणात तो माइटच्या हनुवटीवर तो चावा घेतो. सापाने अचानकपणे केलेल्या हल्ल्यामुळे माइटा किंचाळते आणि सापाला पकडून दुसरीकडे फेकून देते.

अमेरिकी गायिकेने maetasworld नावाच्या आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. माइटाने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘तुमच्यासाठी हा व्हिडीओ बनवताना मला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो पाहा’.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

माइटाने हा व्हिडीओ 19 डिसेंबर रोजी हा व्हिडीओ शेअर केला होता. आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ जवळपास 5 लाख वेळा पाहिला गेला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. माइटाने आपला कमेंट सेक्शन बंद केलं आहे. त्यामुळे या व्हिडीओवर लोक आपली प्रतिक्रिया देऊ शकत नाही. दरम्यान, तो साप विषारी नव्हता त्यामुळे माइटला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

इतर बातम्या :

Happy Birthday Salman Khan | ‘दबंग खान’चं वयाच्या 56व्या वर्षात पदार्पण, अनेकांचा ‘गॉडफादर’ ठरलेल्या सलमानची जीवनशैली माहितेय का?

Salman Khan | ‘टायगर भी जिंदा है और साप भी…’, एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा साप चावला! पाहा सलमान काय म्हणाला…

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.