Kacha Badam गाण्यावर Shooter Dadiनी धरलाय ठेका! यूझर्स म्हणतायत, ‘व्वा! खूप मस्त दादी!’ Video Viral

Shooter Dadi Prakashi Tomar Video : सोशल मीडियावर 'कच्चा बदाम' (Kacha Badam) या बंगाली गाण्यावर नेमबाज दादी प्रकाशी तोमर (Shooter Dadi Prakashi Tomar) यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यावर भूमी पेडणेकर(Bhumi Pednekar)नंही प्रतिक्रिया दिली.

Kacha Badam गाण्यावर Shooter Dadiनी धरलाय ठेका! यूझर्स म्हणतायत, 'व्वा! खूप मस्त दादी!' Video Viral
कच्चा बदाम गाण्यावर नाचताना शूटर दादी प्रकाशी तोमर
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 12:40 PM

Shooter Dadi Prakashi Tomar Video : सोशल मीडियावर ‘कच्चा बदाम’ (Kacha Badam) या बंगाली गाण्याची लोकांमध्ये आलेली क्रेझ थांबत नाहीये. कच्चा बदाम गाण्याचा ज्वर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत चढला आहे. आता या यादीत प्रसिद्ध नेमबाज दादी प्रकाशी तोमर (Shooter Dadi Prakashi Tomar) यांचाही समावेश झाला आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये त्या त्यांच्या नातवांसोबत कचा बदाम गाण्यावर नाचताना दिसत आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर(Bhumi Pednekar)ही या व्हिडिओवर प्रतिक्रिया देण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. व्हिडिओवर कमेंट करताना तिने लिहिले, व्वा! आजी. एक दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला हा व्हिडिओ पाहताच व्हायरल झाला आहे. लोकांना ते खूप आवडत आहे.

रिल्सचा महापूर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की शूटर दादी प्रकाशी तोमर दोन मुलींसोबत ‘कच्चा बदाम’ गाण्यावर नाचत आहेत. शूटर दादी मुलींसोबत केमिस्ट्री जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते त्यांना अगदी चांगले जमतही आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या गाण्यावर रिल्सचा महापूर आला आहे. हे बंगाली गाणे कोणत्याही प्रसिद्ध गायकाने गायले नसून, एका छोट्या मोठ्या वस्तू विक्रेत्या भुबन बद्याकरने गायले आहे. भुबन मूळचा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील आहे. हे सर्व तेव्हा सुरू झाले, जेव्हा रस्त्यावर तो वस्तू विकत असताना, एका व्यक्तीने भुबनची अनोखी शैली त्याच्या मोबाइलवर रेकॉर्ड केली आणि व्हायरल झाली. तेव्हापासून कच्चा बदाम या गाण्याने इंटरनेटवर अधिराज्य गाजवले आहे.

इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर

शूटर दादीने स्वतः त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला सोशल मीडिया यूझर्सकडून खूप पसंती मिळत आहे. 1200हून अधिक लोकांनी याला लाइक केले आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे. त्याच वेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक सतत त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका यूझरने लिहिले, ‘व्वा! खूप मस्त दादी.’ त्याचप्रमाणे इतर यूझर्सदेखील शूटर दादीच्या नृत्याचे कौतुक करत आहेत. एकूणच, लोक या व्हिडिओचा खूप आनंद घेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Dadi Prakashi (@shooterdadi)

आणखी बातम्या : 

Kacha Badam : बंगालीनंतर आता हरयाणवी व्हर्जननं घातलाय धुमाकूळ, 32 लाखांहून जास्तवेळा पाहिला गेलाय ‘हा’ Video

तरुणाईला वेड लावणाऱ्या Kacha Badam गाण्यावर रील्सचा पाऊस, पाहा Viral झालेले तरुणींचे काही खास Videos

एक से बढ़कर एक जुगाडू | Desi Jugaad Video : बसमध्ये सीट मिळवण्यासाठी असं काही करू नका, नाहीतर…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.