Video : तेरी शकल गंदी, ओ नल्ली, बासी बर्फी तू कल की…; Srivalli गाण्याचं Siblings Version पाहिलं का?

Srivalli Siblings Version : पुष्पा द राइज (Pushpa the rise) हा अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा सिनेमा सध्या धुमाकूळ घालतोय. तरुणाईवर याचा फिव्हर इतका चढलाय, की सोशल मीडियावर याच्या रील्स पाहायला मिळतायत. श्रीवल्ली (Srivalli) हे गाणं तर सर्वात पुढे आहे.

Video : तेरी शकल गंदी, ओ नल्ली, बासी बर्फी तू कल की...; Srivalli गाण्याचं Siblings Version पाहिलं का?
श्रीवल्ली गाण्याचं सिब्लिंग व्हर्जन
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 7:30 AM

Srivalli Siblings Version : पुष्पा द राइज (Pushpa the rise) हा अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा सिनेमा सध्या धुमाकूळ घालतोय. तरुणाईवर याचा फिव्हर इतका चढलाय, की सोशल मीडियावर याच्या रील्स पाहायला मिळतायत. श्रीवल्ली (Srivalli) हे गाणं तर सर्वात पुढे आहे. या गाण्यावर सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ तयार केले जात आहेत. कधी कुणी रेल्वे स्टेशनवर तर कुणी शेतात कुणी आपल्या घरात यावर मजेशीर व्हिडिओ तयार करण्यात गुंतलं आहे. तरुणाईसोबत मोठ्यांनाही या गाण्यानं भुरळ घातलीय. या गाण्यावर भजन गायल्याचे व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील. एकूणच सर्वजण या गाण्यांचा आनंद घेत आहेत. आता असाच एक व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणलाय, यात श्रीवल्ली गाण्यावर धमाल केलीय बहीण भावानं…

बहीण आणि भाऊ

व्हिडिओमध्ये बहीण आणि भाऊ दिसून येत आहेत. बहीण मोबाइलमध्ये गुंतलीय. तर भाऊ हेडफोन घालून गाणं म्हणतोय. श्रीवल्ली गाण्याचे बोल त्यानं बदलून टाकलेत. त्याऐवजी तो म्हणतोय तेरी शकल गंदी, ओ नल्ली, बासी बरफी तू कल की… यासह व्हिडिओमध्ये आणखीही धमाल आहे. भाऊ हे गाणं गात असताना बहीण आश्चर्याचे हावभाव करत असते. हा व्हिडिओ सध्या तुफान चालतोय.

यूट्यूबवर अपलोड

यूट्यूबवर प्रियल कुकरेजा (Priyal Kukreja) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 6 फेब्रुवारीला अपलोड केलेल्या या व्हिडिओला साडे चार मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अजून त्यात वाढच होत आहे. तर Srivalli Siblings Version असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आलंय. यूझर्स हा व्हिडिओ पसंत करत आहेत. त्याचबरोबर कमेंट्सही करताना दिसून येत आहेत. (Video Courtesy – Priyal Kukreja)

Video | कुडाळच्या डबलबारीत वाजलं #Srivalli! श्रोते म्हणाले, वाह बुवा एक नंबर…

Viral : तुम्हाला फोडता येतील का असे फुगे? 20 मिलियनहून अधिकवेळा पाहिला गेलाय ‘हा’ 10 सेकंदांचा Video

Viral : पोलिसांना फायर नाही तर फूल समजलं आणि..; रक्तचंदन तस्कराच्या रिअल लाइफमध्ये काय घडलं? वाचा

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.