मुंबई : बिग बॉस 13 फेम तसेच छोट्या पडद्यावरील आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे (Siddhartha Shulka ) निधन झाल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकारच्या झटक्यामुळे सिद्धार्थचे निधन झाले. सिद्धार्थच्या निधनामुळे सोशल मीडियावर त्याचे जुने अनेक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. व्हिडीओंच्या माध्यमातून त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जातोय. सध्या सिद्धार्थचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील सिद्धार्थचे बोल ऐकून त्याच्या चाहत्यांना भरुन आलंय. (siddhartha shulka old video went viral on social media saying life is to long)
सिद्धार्थचा एक जुन्हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ ट्विटरवर @YoutuberMrBug या अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय. यामध्ये सिद्धार्थ यूट्यूबर मिस्टर बगशी कॅमेऱ्याच्या माध्यमातून संवाद साधतोय. “मी तुला भेटू शकलो नाही. त्याबद्दल माफी मागतो. मला तुझ्या बहिणीविषयी समजलं. ती चांगली असेल अशी आशा करतो. ती लवकरच बरी होईल,” अशा शब्दांत सिद्धार्थ यूट्यूबर बगशी बोलतोय. तसेच पुढे बोलताना आयुष्य खूप मोठं आहे. पुन्हा कधीतरी भेटू, असेही सिद्धार्थने म्हटलंय.
पाहा व्हिडीओ :
I remember the words when he said to me in videos for me that ” lambi h zindagi fir milenge fir se…”#SidharthShukla #RestInPeace
Always a Inspiration to me for my life… ??????? pic.twitter.com/oTcIegTpSF
— ? Mr. Bug ? (@YoutuberMrBug) September 2, 2021
हृदयविकाराच्या झटक्यामुळे सिद्धार्थचे अकाली निधन झाले आहे. पण तो या व्हिडीओमध्ये आयुष्य खूप मोठं आहे, असं सांगतोय. सिद्धार्थच्या याच शब्दांमुळे त्याचे चाहते भावूक झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. हा व्हिडीओ कधीचा आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, सिद्धार्थच्या मृत्यूनंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
इतर बातम्या :
झोपण्यापूर्वी गोळ्या घेतल्या, गाडीची काचही फुटलेली, आदल्या रात्री सिद्धार्थ शुक्लासोबत काय काय घडलं?
Sidharth Shukla dies : ‘SidNaaz’ची जोडी तुटली, सिद्धार्थच्या जाण्याने कोलमडली शहनाज गिल
(siddhartha shulka old video went viral on social media saying life is to long)
भाकरीच्या चंद्राला महागाईचं ग्रहण; 8 महिन्यांत गॅस सिलिंडर दर 190 रुपयांनी वाढलेhttps://t.co/XtAZ5HFvfn#GasCylinderPriceHike | #gas | #cylinderPriceHike
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 2, 2021