Video: पगडी खोलली, पाण्यात फेकली, दोघांना वाचवलं, शिख तरुणांचा चित्तथरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
कॅनडाच्या गोल्डन इयर्स वॉटर फॉलची आहे. जिथं सायंकाळी सहाच्या सुमारास दोन लोक अडकले होते. त्यापैकी एक घसरला आणि पाण्यात पडला. सर्व प्रयत्न करूनही तो बाहेर पडू शकला नाही. त्याच्या जीवाला धोका होता.
एका व्यक्तीचा जीव वाचवणाऱ्या शीख समाजातील पाच तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धबधब्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी त्यांनी आपला जीव पणाला लावला. ब्रिटीश कोलंबियाच्या शीख कम्युनिटीनेही त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. (Sikh youths rescued the two who were being carried to the waterfall by making a turban rope. Incidents in Canada)
ही घटना कॅनडाच्या गोल्डन इयर्स वॉटर फॉलची आहे. जिथं सायंकाळी सहाच्या सुमारास दोन लोक अडकले होते. त्यापैकी एक घसरला आणि पाण्यात पडला. सर्व प्रयत्न करूनही तो बाहेर पडू शकला नाही. त्याच्या जीवाला धोका होता.
ही माहिती बचाव पथकाला देण्यात आली. पण, ते तिथे पोहचण्यापूर्वीच, शीखांचा एक गट धबधब्यावळ उतरला. पाच तरुण शीख तिथं पोहोचले आणि त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढलं. यासाठी त्याने त्याच्या पगड्या काढल्या आणि त्याची दोरी बनवली, याच पगडीने त्यांनी पाण्यात वाहणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवला.
पाहा व्हिडीओ:
A video of the incident on Monday, in which five Sikh hikers tied their dastaars (turbans) together to save a man who had slipped and fallen at the Lower Falls at Golden Ears Park. Video courtesy @globalnews
Kudos to these young men on their quick thinking and selflessness. pic.twitter.com/XQuX27OH5i
— Sikh Community of BC (@BCSikhs) October 16, 2021
बचाव पथकाच्या सदस्याने सांगितले की, आमची टीम तिथे पोहचेपर्यंत शीख समुदायाच्या लोकांनी तरुणांना सुखरूप बाहेर काढले होतं. त्यांनी त्यांची पगडी काढून एक लांब दोरी बनवली होती, जी धबधब्यातील अडकलेल्या व्यक्तीने पकडली आणि त्या तरुणाला बाहेर काढण्यात आलं.
व्यक्तीचा जीव वाचवल्याबद्दल शीख तरुणांचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. सोशल मीडिया युजर्स, त्यांना सलाम करत आहेत. कारण धबधब्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी त्याने आपला जीव पणाला लावला.
हेही पाहा: