Video | चिमुकल्याच्या डान्सने उडवली धम्माल, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सध्या व्हायरल होणारा व्हिडीओसुद्धा अशाच एका जबरदस्त डान्सचा आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहे.
मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ अतिशय़ मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपला मूड अगदी फ्रेश होतो. नृत्य सादरीकरणाचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर विशेष आवडीने पाहिले जातात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा एका जबरदस्त डान्सचा आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहे. (small boy dancing very funny video went viral on social media)
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काय आहे ?
सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक छोटा मुलगा दिसतो आहे. हा मुलगा अगदीच मजेदाररीत्या डान्स करत आहे. त्याच्या डान्सची पद्धत आणि त्याची तन्मयता पाहून नेटकरी चकीत झाले आहेत. एक छोटा मुलगा अशा प्रकारचा डान्स कसा करु शकतो ? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
छोट्या मुलाचा जबरदस्त डान्स
या व्हिडीओमध्ये एक छोटासा मुलगा जबरदस्त डान्स करतोय. त्याची डान्स करण्याची पद्धत अगदीच मजेदार आणि थक्क करणारी आहे. त्याच्या भोवती काही मुलं जमली आहेत. या मुलांनी शाळेचा गणेवश परिधान केला असून ती अतिशय टापटीप दिसत आहेत. मात्र, डान्स करणाऱ्या मुलाने अगदीच साधारण कपडे घातले आहेत. साधारण कपडे परिधान करुनही तो असाधारण असा डान्स करतो आहे. त्याची हात आणि पाय हालवण्याची पद्धत तर अतिशय आकर्षक आहे. हा मुलगा डान्स करताना बाजुला ऊभी असलेली मुले टाळ्या वाजवत त्याला प्रोत्साहित करत आहेत.
पाहा व्हिडीओ :
Twitter right now pic.twitter.com/NiANFCk538
— Umashankar Singh उमाशंकर सिंह (@umashankarsingh) July 8, 2021
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, हा व्हिडीओ यापूर्वी व्हायरल झाला होता. मात्र, जुना असला तरी या व्हिडीओची पुन्हा एकदा नव्याने चर्चा होत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला @umashankarsingh नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. नेटकरी या छोट्या मुलाच्या डान्समुळे चांगलेच प्रभावित झाले असून या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
इतर बातम्या :
VIDEO | भरधाव कारवर जेव्हा अजगर उडी घेतो तेव्हा… ; व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल
शेवटी सिंहिणसुद्धा एक आई असते; हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की म्हणाल ‘माँ, तुझे सलाम’
ऐकावे ते नवलच! वधूच्या डोक्यावर तोडले जातात पापड, पहा या अनोख्या विवाह सोहळ्याचा व्हिडिओ
(small boy dancing very funny video went viral on social media)