मुंबई : सध्या सोशल मीडियावर झळकणाऱ्या टॅलेंटची कमी नाही. सोशल मीडियामुळे हे टॅलेंज जगासमोर येत आहे. याच सोशल मीडियावर कधी कोण फेमस होईल सांगता येत नाही. दररोज काही व्हिडीओ व्हायरल होत असतात, ट्रेंडिंगमध्ये येतात. आधी टिकटॉक, मग आता इन्स्टा रिल्सवर अनेकजण शॉर्ट व्हिडीओ करत आहेत. (Social media viral video youth dancing in his style trending video)
सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा डान्स चांगलाच चर्चेत आहे. आपल्याच मस्तमौला अंदाजात हा तरुण भन्नाट डान्स करत आहे. चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव आणून हा तरुण ज्या प्रकारे डान्स करतोय, ते पाहून हसू आवरणार नाही. अनेकांनी या भन्नाट डान्सचं कौतुक केलं आहे, तर बहुतेक जण हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
डीजेचा ताल सुरु आहे आणि हा तरुण मदहोश होऊन नाचत आहे. एकापेक्षा एक भन्नाट स्टेप्स करुन हात आणि पाय वेगवेगळ्या पद्धतीने अॅक्टिंग करुन हा डान्स करत आहे. एका बाजूला घोळका जमून सर्वजण डान्स करत आहेत, तर दुसरीकडे हा पठ्ठ्या एकटाच आपल्याच नादात तालबद्ध नाचत आहे. हा तरुण कोण, कुठला याबाबतची माहिती नाही. मात्र त्याच्या डान्सिंग व्हिडीओमुळे मात्र तो तुफान चर्चेत आहे.
VIDEO : पाहा तरुणाचा भन्नाट डान्स
संबंधित बातम्या
PHOTOS: संशोधकही याचं गुपित उलगडू शकले नाहीत असे ‘रहस्यमय’ दगडी माठ
दोन चिमुकल्यांची थेट पंतप्रधानांना साद; शाळा बंद राहिल्यामुळे मुलांनी बनवला धम्माल व्हिडिओ
(Social media viral video youth dancing in his own style trending video)