Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zomato : सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून बनला झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय, काहीच दिवसात वाचला अडचणींचा पाढा…

'वेल सेटल्ड' नोकरी सोडून फुड डिलिव्हर बॉयची नोकरी करण्याचा सामान्य माणूस विचार करणार नाही. पण एका तरूणाने असा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर त्याला जो अनुभव आला तो त्याने इतरांसोबत शेअर केला आहे.

Zomato : सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी सोडून बनला झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय, काहीच दिवसात वाचला अडचणींचा पाढा...
झोमॅटो
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 12:30 PM

मुंबई : शिक्षण झालं की सगळेच जण चांगल्या नोकरीच्या (Job) शोधात असतात. पण अशी ‘वेल सेटल्ड’ (Well settled) नोकरी सोडून फुड डिलिव्हर बॉयची नोकरी करण्याचा सामान्य माणूस विचार करणार नाही. पण एका तरूणाने असा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर त्याला जो अनुभव आला तो त्याने इतरांसोबत शेअर केला आहे. श्रीनिवासन जयरामन (Shriniwasan Jayraman) हा तरूण चेन्नईतील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software Engineer) म्हणून काम करत होता. सगळं ठीक चाललं होतं पण त्याने ही नोकरी सोडून झोमॅटो या फुड डिलिव्हर कंपनीसोबत काम करण्याचं ठरवलं. तो झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय (Zomato Delivery Boy) म्हणून काम करू लागला. पण तिथे त्याला काही वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलं.

श्रीनिवासन जयरामन या तरूणाला नोकरी दरम्यान जो अनुभव आला. तो त्याने इतरांसोबत शेअर केला आहे. “काही वेळा हॉटेल आणि डिलिव्हरी लोकेशनमधलं अंतर खूप जास्त असतं. मला एकदा तर रेस्टॉरंटपासून तब्बल 14 किलोमीटर दूर असणारी ऑर्डर मिळाली होती. त्यामुळे मला जास्तीचा प्रवास करून हे पार्सल पोहोचवावं लागलं. अनेकांना असं वाटतं की काही भागांतून भरपूर ऑर्डर मिळत असतात. पण तसं काही नसतं. लोकांनी अंदाज लावलेल्या भागातून मला सर्वात कमी ऑर्डर मिळाल्या आहेत” , असं श्रीनिवासन जयरामन यांनी सांगितलं आहे.

पुढे त्याने लोकेशन आणि संपर्काबाबतचा अनुभव सांगितला आहे. “बरेचसे ग्राहक त्यांचं अचूक लोकेशन देत नाहीत. त्यांचा फोन नंबरही अपडेटेड नसतो. त्यामुळे ऑर्डर वेळेत पोहोचवण्यास अडचणी येतात. एखाद्या नव्या भागात रेस्टॉरंट शोधण्यासही अडचणी येतात. गुगल मॅप्सद्वारेही लोकेशन सापडत नाही. कधी०कधी 3 तासात केवळ तीनच ऑर्डर मिळतात. पेट्रोलचे दर दररोज वाढत आहेत. त्यामुळे तोही खर्च आहे. त्यामुळे वाटतं तितका हा जॉब सोपा नाही”, असंही श्रीनिवासन जयरामन याने सांगितलं आहे.

अनेकांजण आपल्या हातातील चांगली नोकरी सोडून वेगळ्या कामाचा शोध घेतात. त्यामुळे कधी फायदा होतो तर कधी अश्या अडचणींना सामोरं जावं लागतं.

संबंधित बातम्या

Social Media Trending : ‘जुगाड रिक्षा’, तळपत्या उन्हात रिक्षाची गारेगार सफर…

Viral Video : विचित्र हेअरस्टाईलची सोशल मीडियावर चर्चा, नेटकरी म्हणतात, पण कशासाठी ‘अशी’ हेअरस्टाईल?

Shashi Tharoor VIDEO | आधी गप्पांचा व्हिडीओ, आता सुप्रिया सुळेंना टॅग करत थरुर यांनी बॉलिवूड गाणंच लिहिलं

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.