Puzzle: गणित कसं होतं तुमचं शाळेत? चला सांगा याचं उत्तर
समीकरण योग्य रीतीने सोडवल्याच्या समाधानासारखं सुख जगात दुसरं कुठलंच नाही.
गणिताचे प्रश्न पाहून तुम्हालाही डोकेदुखी होते की सोडवायला तासंतास लागतात? आपण खरं तर आधी लहान कोडी सोडवली पाहिजेत आणि नंतर आपल्या मेंदू चालविण्यासाठी ऑप्टिकल भ्रमाचा आधार घ्यावा. सोशल मीडियावर अशी अनेक कोडी असतील जी सोडवणं सोपं नाही. आपल्या शाळेच्या दिवसांमध्ये आपण गणिताची समीकरणे सोडविण्यासाठी BODMAS नियम वापरला असेल. समीकरण योग्य रीतीने सोडवल्याच्या समाधानासारखं सुख जगात दुसरं कुठलंच नाही. नुकतंच गणिताचा एक ब्रेन टीझर ऑनलाइन समोर आलाय, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू आहे.
हे कोडं पाहिल्यानंतर अनेक जण योग्य उत्तरासाठी खूप प्रयत्न करतील. बेनोन्विनचा हा ब्रेन टीझर कोणत्याही कॅप्शनशिवाय ट्विटरवर पोस्ट करण्यात आला होता.
व्हायरल ब्रेन टीझरमध्ये कोक, बर्गर आणि फ्राईज आहेत, ज्यापैकी प्रत्येकाचे मूल्य हे ठरलेले आहे. आपल्याला फक्त प्रत्येक वस्तूचं मूल्य शोधायचंय. एकदा ते मूल्य सापडलं की तुम्हाला हे कोडं सुद्धा आरामात सोडवता येणार.
बरं नुसतं मूल्य शोधून उपयोग नाही. योग्य ते उत्तर मिळविण्यासाठी तुम्हाला BODMAS चा नियम माहित असणं आवश्यक आहे. कारण एकदा मूल्य शोधलं की तुम्हाला हा नियम लागू करून याचं उत्तर मिळवावं लागणारे.
9 जानेवारी रोजी शेअर केल्यापासून या ट्विटला 42,600 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि ही संख्या अजूनही वाढत आहे. या शेअरला अनेक कमेंट्सही मिळाल्या आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्नात गुंतलेला असतो. कमेंट बॉक्समध्ये युजर्स 15, 25, 60, 17 अशी उत्तरं देत आहेत.
या मजेशीर टीझरला योग्य उत्तर शोधणाऱ्यांसाठी आधी ड्रिंक्स, बर्गर आणि फ्राईज या वेगवेगळ्या मूल्यांचा शोध घ्या आणि मग BODMAS लावा. पेयाची किंमत 10, बर्गरची किंमत 5 आणि फ्राईजची किंमत 2 आहे. आता, 5 + (2 x 10) = 25. अशा प्रकारे, योग्य उत्तर 25 आहे.