धक्कादायक! पत्नीच्या हट्टासाठी आईला नदीत फेकलं, मानवतेला काळीमा फासणारी घटना
कर्नाटकातील 38 वर्षीय युवकाने आपल्या 60 वर्षीय आईला नदीत फेकून दिलं. कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार भीमाशंकर यलीमेली असं आरोपीचं नाव आहे. त्याने त्याचा मित्र मुत्तप्पा वड्डरच्या मदतीने ही घटना घडवून आणली.
मुंबई : आपल्या आईसाठी (Mother) आपल्या आयुष्यात एक वेगळं स्थान असतं. तिला काहीही झालं तरी आपल्याला त्रास होतो. पण लग्न झालं की माणूस बदलतो, असं अनेकदा म्हटलं जातं. पण त्याचा प्रत्यय तुम्हाला ही घटना पाहिल्यानंतर येईल. आपल्या पत्नीच्या हट्टासाठी एका तरूणानं आपल्या आईला नदीत फेकून दिल्याची घटना घडलीये. कर्नाटकातील 38 वर्षीय युवकाने आपल्या 60 वर्षीय आईला नदीत फेकून दिलं. कर्नाटकातील (Karnataka) यादगीर जिल्ह्यातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार भीमाशंकर यलीमेली (Bhimashankar Yalimeli) असं आरोपीचं नाव आहे. त्याने त्याचा मित्र मुत्तप्पा वड्डरच्या मदतीने ही घटना घडवून आणली. याबाबत टाईम्स ग्रुपने वृत्त दिलं आहे.
कर्नाटकातील 38 वर्षीय युवकाने आपल्या 60 वर्षीय आईला नदीत फेकून दिलं. कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार भीमाशंकर यलीमेली असं आरोपीचं नाव आहे. त्याने त्याचा मित्र मुत्तप्पा वड्डरच्या मदतीने ही घटना घडवून आणली. आरोपीची आई आजारी होती. आई रचम्मा शराबन्ना यालीमेलीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून नेलं. मात्र दवाखान्यात नेण्याऐवजी वाटेतच आईला शहापूर तालुक्यातील हुरसागुंडगी इथे नेऊन भीमा नदीत फेकून दिलं.
भीमाशंकर याच्या पत्नीला आई घरात नको होती. ती वारंवारा आपल्या पतीकडे याबाबत हट्ट करत होती. त्यामुळे त्याने आपल्या आईला नदीत फेकून दिल्याची माहिती आहे. भीमाशंकरच्या आईचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. पोलिसांनी याचा तपास केला असता हा सगळा प्रकार उघडकीस आला. आईच्या आजारपणामुळे पत्नी कंटाळली होती. तिला या सगळ्यातून मुक्तता हवी होती त्यासाठी मी हे पाऊल उचललं असं भीमाशंकर यांने सांगितलं आहे.आपल्या आईसाठी आपल्या आयुष्यात एक वेगळं स्थान असतं. तिला काहीही झालं तरी आपल्याला त्रास होतो. पण लग्न झालं की माणूस बदलतो, असं अनेकदा म्हटलं जातं. पण त्याचा प्रत्यय तुम्हाला ही घटना पाहिल्यानंतर येतो. दरम्यान या घटनेननंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित बातम्या