चिमुकल्यानं वाचवला आईचा जीव, तत्परतेचं होतंय कौतुक!
भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी दीपांशु काबरा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
लहान मुलांची अनेक धाडसी कृत्ये तुम्ही पाहिली असतील, पण सध्या सोशल मीडियावर एक लहान मूल व्हायरल होत आहे. एका व्हिडीओमध्ये तो आईचा जीव वाचवताना दिसतोय. हे सगळ्या इतक्या पटकन घडतं की व्हिडीओ बघताना आपल्यालाही तो पचवायला जड जातो. का जाड जातो तर त्याचंही कारण आहे, हा मुलगा इतका लहान आहे की तो असं काही करेल असं वाटतंच नाही. असा प्रकार करताना दिसत आहे, जो व्हायरल झाला.
भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी दीपांशु काबरा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आई गॅरेजचा दरवाजा दुरुस्त करत होती तेव्हा तिची शिडी खाली पडली. आईला लटकलेलं पाहून त्या चिमुकल्याने शिडी परत ठेवून तिला तत्परतेने मदत केली.”
व्हायरल व्हिडीओमध्ये एक सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये एक महिला दरवाजाजवळ शिडी लावून काहीतरी करत होती. या दरम्यान शिडी खाली पडली, जेव्हा शिडी खाली पडली तेव्हा ती वरच्या बारला लटकली. तिने त्याला पकडून ठेवले शिडी पडताच तिथे उभा असलेला तिचा लहान मुलगा लगेच पटकन शिडीजवळ गेला आणि त्याने आईची मदत केली.
माँ गैराज का दरवाज़ा रिपेयर कर रहीं थी कि तभी उनकी सीढ़ी गिर गयी. माँ ऊपर लटके देख नन्हे जांबाज़ ने पूरी जान लगाकर सीढ़ी को वापस लगाकर उनक़ी मदद क़ी…
इस छोटे बच्चे क़ी सूझ-बूझ और हिम्मत क़ी जितनी प्रशांसा क़ी जाए कम है. pic.twitter.com/GjX6Ol3pid
— Dipanshu Kabra (@ipskabra) December 23, 2022
मुलाने आपली हुशारी दाखवत तिला लगेच ती शिडी उभी केली. ती महिला शिडी लावल्या लावल्या पटकन खाली उतरली. अनेक युझर्सनी या चिमुकल्याचं कौतुक केलंय.