129 मुलांचा बाप असलेला हा ‘विकी डोनर’ तगडा आहे! या वर्षी त्यात आणखी 9 मुलांची भर पडणार

Sperm Donor : डेलीमेलनं दिलेल्या वृत्तनुसार त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून स्पर्म डोनेट केलंय. ज्यांच्या या कृतीमुळे भलेही अनेक कुटुंबांत लहान मुलांच्या खळखळण्याचा आवाज निनादला आहे.

129 मुलांचा बाप असलेला हा 'विकी डोनर' तगडा आहे! या वर्षी त्यात आणखी 9 मुलांची भर पडणार
स्पर्म डोनेट करुन सर्वात जास्त मुलांना जन्म देण्याचा दावा करणारा निवृत्त शिक्षक (Photo- Twitter)
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 9:08 AM

आयुषमान खुरानाचा विकी डोनर (Vicky Donor) जर तुम्ही पाहिला असेल, तर तुम्हाला स्पर्म डोनर हा विषय नव्यानं सांगण्याची गरजच नाही! स्पर्म डोनेट (Sperm Donor) करुन मुलांना जन्म देण्यासाठी मदत करणं ही फार महत्त्वाची पण फार चर्चिली न जाणारी गोष्ट आहे. अशाच एका डोनरची गोष्ट आता नव्यानं समोर आली आहे. ब्रिटनमधील (Britain) एका निवृत्त शिक्षकामुळे आतापर्यंत 129 मुलांचा जन्म झाला आहे. दरम्यान, या वर्षी म्हणजे 2022मध्ये त्यात आणखी 9 मुलांची भर पडणार आहे. काय या निवृत्त शिक्षकाच्या स्पर्ममुळे 9 जणी गरोदर राहिल्याचा दावा करण्यात आला आहे. वयाच्या 58व्या वर्षी स्पर्म डोनेट करुन आतापर्यंत या निवृत्त शिक्षकानं 129 मुलांना जन्म दिला आहे. अर्थात अप्रत्यक्षपणे हा निवृत्त शिक्षक 129 मुलाचा बाप झालाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा निवृत्त शिक्षक स्पर्म डोनेट करण्याचा एक रुपयाही घेत नाही. फुकट स्पर्म डोनेट करणाऱ्या या निवृत्त गुरुजींबद्दल जाणून घेऊयात!

नाव काय? कुठचे आहेत नेमके?

ज्या स्मर्म डोनरबद्दल आपण चर्चा करतोय, त्या स्पर्म डोनरचं नाव आहे क्लायवेस जोन्स. त्यांचं वय आता 66 वर्ष आहे. वयाच्या 58व्या वर्षी म्हणजेच आठ वर्षांपासून ते स्पर्म डोनेट करत आहेत. ब्रिटनच्या चॅडसडॅनमधील डर्बीमध्ये राहणारे क्लायवेस जोन्स हे निवृत्त शिक्षक आहेत.

फेसबुक डोनर

दरम्यान, क्लायवेस जोन्स हे काही अधिकृत डोनर नाहीत. त्यांच्या स्पर्म डोनेट करण्यावरुन काही जाणकारांनी त्यांना ताकीदही दिली आहे. डेलीमेलनं दिलेल्या वृत्तनुसार त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून स्पर्म डोनेट केलंय. ज्यांच्या या कृतीमुळे भलेही अनेक कुटुंबांत लहान मुलांच्या खळखळण्याचा आवाज निनादला आहे. आनंद द्विगुणित झाला आहे. पण अशाप्रकारे स्पर्म डोनेट करणं, हे अधिकृत नाही. त्यांनी कोणत्याही अधिकृत फर्टिलिटी क्लिनिकमध्ये जाऊन स्पर्म डोनेट केलेला नसल्यानंही चिंता व्यक्त केली जातेय.

फुकट स्पर्म देणाऱ्या गुरुजींचं काय म्हणणंय?

दरम्यान, फुकट स्पर्म देणाऱ्या निवृत्त गुरुजींनी, सगळ्यात जास्त मुलांना जन्म देण्याच कारण ठरलेला मी जैविक बाप आहे, असा दावा केला आहे. पुढची काही वर्ष ते स्पर्म डोनेट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. इतकंच काय तर येत्या काही वर्षात 150 मुलं जन्माला घालणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आतापर्यंत तायंनी डर्बी, बर्मिंघम, स्टोक आणि नॉटिंगममधील अनेक कुटुंबांना आपला स्पर्म डोनेट केला आहे.

बायकोला नाही आवडत

निवृत्त शिक्षक असलेल्या डोनर जोन्स यांची बायको त्यांच्यापासून वेगळं राहते. त्यांना आपल्या नवऱ्याचं स्पर्म डोनेट केलेंलं आवडत नाही. 1978 साली जोन्स यांचं लग्न झालं होतं. दरम्यान, जोन्स हे ‘फोन मॅन्स 175 बेबीज’ माहितीपटातही झळकले आहेत.

संबंधित बातम्या :

Sperm Donor | ‘स्पर्म बँक’ बुडण्याची भीती? महामारीनंतर ‘विकी’ डोनर्स गेले कुठे?

ट्ट कपड्यांमुळे Spermमध्ये घट? टाईट जीन्स, ट्राऊझरसोबत आत घट्ट अंडरवेअर घालणाऱ्यांनो, हे वाचाच!

So impressive! बास्केटबॉलचं कौशल्य दाखवून डॉगीनं जिंकलं सोशल मीडिया यूझर्सचं मन, पाहा Video

आता शाकाहारी फिश फ्रायचा Video होतोय Viral; यूझर्स म्हणतायत, या किंमतीत दोन किलो मासे येतील!

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.