Trending बंगाली गाणं Kacha Badamवर एअर होस्टेसनं केला फ्लाइटमध्येच डान्स, Video Viral

दररोज असं काहीतरी सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होताना दिसतं, जे लोकांना खूप आवडतं. विशेषतः जर डान्स व्हिडिओ (Dance Video) असेल तर तो खूप व्हायरल होतो. सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात, जे येताच व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर एक अतिशय सुंदर डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Trending बंगाली गाणं Kacha Badamवर एअर होस्टेसनं केला फ्लाइटमध्येच डान्स, Video Viral
विमानात नाचताना एअर होस्टेस
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 2:14 PM

Dance In Flight : दररोज असं काहीतरी सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होताना दिसतं, जे लोकांना खूप आवडतं. विशेषतः जर डान्स व्हिडिओ (Dance Video) असेल तर तो खूप व्हायरल होतो. सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात, जे येताच व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर एक अतिशय सुंदर डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच म्हणाल, हा एक भन्नाट व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये एक एअर होस्टेस दिसत आहे, ज्यामध्ये ती ट्रेंडिंग बंगाली गाणं Kacha Badamवर डान्स करताना दिसत आहे. आता तिचा हा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे. आता इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक एअर होस्टेस दिसत आहे.

सोशल मीडियावर झपाट्याने ट्रेंड

स्पाईसजेटची एअर होस्टेस उमा मीनाक्षी जिचा पूर्वीचा लेझी लाडवर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने ट्रेंड होत होता, तिनं एक नवीन क्लिप पोस्ट केली आहे आणि नेटिझन्सना आता हा नवीन व्हिडिओ आवडू लागला आहे. नवीन व्हिडिओमध्ये, उमा रिकाम्या फ्लाइटमध्ये दिसत आहे आणि व्हिडिओमध्ये ती Kacha Badam या ट्रेंडिंग बंगाली गाण्यावर नाचत आहे. ट्रेंडवर चालणारे हे आव्हान आता उमानेही चमकदारपणे पार पाडले आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल

Kacha Badam गाणं नुकतंच इन्स्टाग्रामवर व्हायरल झालं असून अनेक लोक त्यावर डान्स रील बनवत आहेत. हे गाणं पश्चिम बंगालमधल्या एका शेंगदाणा विक्रेत्यानं गायलं आहे, ज्याचं नाव भुबन बड्याकर आहे. रस्त्यावर शेंगदाणे विकताना भुबन हे अनोखं गाणं गाताना कोणीतरी रेकॉर्ड केलं तेव्हा ते व्हायरल झालं. कोणीतरी ते पेपी ट्रॅकमध्ये रीमिक्स केलं आणि हे गाणे आता Instagrammersचं आवडतं बनलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Uma meenakshi (@yamtha.uma)

व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाइक्स

या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्येही अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एअर होस्टेस फ्लाइटमध्येच रील बनवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तरुणीने स्पाइस जेटचा ड्रेस घातला असून ती मोठ्या उत्साहाने व्हिडिओ शूट करत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाइक्स मिळाले आहेत, तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही पाहायला मिळत आहे.

Video Viral : अंडी वाचवण्यासाठी कोंबडीनं घेतला ‘कोब्रा’शी पंगा; आपल्या चोचीनं केला हल्ला, अखेर…

Kids Video : ‘हा’ चिमुरडा शिडीवरून असा काही उतरतो… यूझर्स म्हणतायत, याला ऑलिम्पिकच्या तयारीला पाठवा

वधूच्या प्रवेशापूर्वीच रडू येईल, वरानं आधीच केली होती भविष्यवाणी; काय घडलं पुढे? पाहा Viral Video

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.