हे आहे सगळ्यात अवघड कोडं! बघा उत्तर सापडतंय का?
लोकांच्या डोळ्यांसमोर गोष्टी घडतात, पण भ्रमामुळे ते लोकांना सहजासहजी दिसत नाही. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत येत आहे.
आजकाल डोळ्यांना फसवणारे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. अशा चित्रांमुळे संभ्रम निर्माण होतो तसेच लोकांना धक्का बसतो. आपण जे पाहतो ते सत्य आहे, अशी एक समजूत आहे. परंतु ऑप्टिकल भ्रमांच्या बाबतीत असे होत नाही. फक्त त्यात दडलेल्या गोष्टी शोधून काढणं हे प्रत्येकासाठीच सोपं असतं असं नाही. लोकांच्या डोळ्यांसमोर गोष्टी घडतात, पण भ्रमामुळे ते लोकांना सहजासहजी दिसत नाही. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत येत आहे
ऑप्टिकल इल्युजनचं वैशिष्ट्य म्हणजे ते पाहून नेटीझन्सना चित्रात काय दिसतं ते समजत नाही. लोक गोंधळून जातात आणि चुकीची उत्तरे देतात. आजकाल अशाच एका चित्राची खूप चर्चा होते, ते पाहून 99 टक्के लोकांच्या मनात गोंधळ निर्माण झालाय.
पियुष तिवारी नावाच्या एका ट्विटर युजरने ऑप्टिकल इल्यूजन असलेला एक फोटो शेअर करत विचारलं आहे की – यात एक केळं लपलेलं पाहिलंत का? यासोबतच हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 11 सेकंदाची वेळ आहे, अशी अट त्यांनी घातली आहे.
व्हायरल फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस लहान मुलांसोबत बाल्कनीमध्ये भांड्यांमध्ये रोपं लावताना दिसत आहे. चित्रात पाळीव प्राणीही दिसत आहेत. पण कलाकाराने चतुराईने या चित्रात कुठेतरी केळं लपवलं आहे. जर तुमची दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण असेल, तर हे आव्हान तुमच्यासारख्या लोकांसाठी आहे. मग उशीर का? केळी शोधा.
लपवून ठेवलेली केळी शोधायची धडपड करत असाल तर चित्राच्या डाव्या बाजूला बारकाईने पाहा. आता तुम्ही ते पाहिलं असेल. त्याचबरोबर ज्या लोकांना अजूनही केळी दिसत नाहीत, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. खाली दिलेल्या चित्रात आम्ही तुम्हाला लाल रंगाच्या वर्तुळामध्ये सांगत आहोत की, केळी कुठे आहे.