या चित्रात पक्ष्यांमध्ये दडलेलं फुलपाखरू शोधायचंय…!
चित्रात फुलपाखरू नाही, असे प्रथमदर्शनी वाटेल, पण हेच तुमच्यासाठी आव्हान आहे.
काही वेळा असं होतं की काही गोष्टी अगदी डोळ्यांसमोर घडतात, पण त्या पटकन दिसत नाहीत. तुम्ही पाहिले असेलच की, लोक डोक्यावर चष्मा लावतात आणि घरभर त्यांचा शोध घेत राहतात, तरीही त्यांना त्यांचा चष्मा कुठे आहे हे माहीत नसतो.ऑप्टिकल इल्युजन काहीसे असेच आहे. ज्याला आपण मॉडर्न कोडं म्हणू शकतो. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये आत दडलेली गोष्ट शोधता शोधता तुमची दमछाक होईल.
या चित्रात पक्ष्यांमध्ये दडलेले फुलपाखरू शोधायचे आहे. हे खूप सोपे वाटेल, परंतु जेव्हा आपण ते शोधण्यासाठी या चित्राकडे बघतो तेव्हा खूप गोंधळतो.
11 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळात 10 पैकी फक्त 2 लोकांनाच चित्रातून फुलपाखरू सापडते, म्हणजेच केवळ 20 टक्के लोकांना या पक्ष्यांमध्ये लपलेले फुलपाखरू दिसेल.
अनेक पक्षी एका बाजूला तोंड करून बसले आहेत. सगळीकडे फक्त पक्ष्यांचे डोळे आणि चोच दिसत आहेत. चित्रात फुलपाखरू नाही, असे प्रथमदर्शनी वाटेल, पण हेच तुमच्यासाठी आव्हान आहे.
जर तुमची तुमची दृष्टी तीक्ष्ण असेल, तर चित्राच्या आत दडलेलं फुलपाखरू शोधायला तुम्हाला फारसा त्रास होणार नाही, पण लक्षात ठेवा की तुम्हाला ते फुलपाखरू ११ सेकंदाच्या आत शोधावं लागेल.
जर तुम्ही फुलपाखरू पाहिले असेल, तर असे म्हणता येईल की तुमची दृष्टी तीक्ष्ण आहे, पण जर तुम्हाला ते दिसत नसेल तर आम्ही तुम्हाला त्याचे उत्तर सांगतो.
फुलपाखरू प्रत्यक्षात चित्राच्या अगदी मध्यभागी आहे. मध्यभागी एका पक्ष्याच्या चोचीजवळ तुम्हाला त्याचे मोठे पंख दिसतील.