बर्फात लपलाय एक सैनिक! सांगा कुठाय
अशा ऑप्टिकल भ्रमांना कधीकधी मानसशास्त्राचा एक भाग मानले जाते. मानवी मेंदू वेगवेगळ्या पद्धतीने वस्तू किंवा चित्रे पाहूनच वेगवेगळे आकलन करू शकतो.
ऑप्टिकल इल्युजन हा प्रत्येकाचा विषय नसतो, कारण दिलेल्या वेळेत कोडे सोडवणे फार कमी लोकांना शक्य होते, हे आपण इंटरनेटवर अनेकदा पाहिले आहे. आजकाल सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन म्हणून अनेक फोटो शेअर केले जात आहेत. असाच एक व्हायरल ऑप्टिकल भ्रम युक्रेनच्या नॅशनल गार्डने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसून आला आहे, ज्यात कठीण भूभाग आणि परिस्थितीत युद्ध लढत असलेल्या आपल्या सैनिकांचा उत्साह आणि शौर्य दिसून येत आहे. हे ऑप्टिकल इल्युजन पिक्चर तुम्हाला गोंधळात टाकेलच पण तुम्हाला सहज फसवू शकेल.
हे चित्र वेगळ्या पद्धतीने पाहण्याचे आव्हान देते. अशा ऑप्टिकल भ्रमांना कधीकधी मानसशास्त्राचा एक भाग मानले जाते. मानवी मेंदू वेगवेगळ्या पद्धतीने वस्तू किंवा चित्रे पाहूनच वेगवेगळे आकलन करू शकतो.
युक्रेनच्या नॅशनल गार्डने रशियाशी युद्ध लढणाऱ्या आपल्या सैनिकांचा उत्साह दाखवणारा हा फोटो शेअर केला आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांचे सैन्य आपल्या देशासाठी शौर्याने लढत आहे. अत्यंत थंड हवामान आणि दुर्गम भागात बर्फाळ वातावरणात दोन्ही देशांचे सैनिक लढत आहेत.
या व्हायरल ऑप्टिकल भ्रमाने लोकांना चांगलंच गोंधळात टाकलंय. कारण चित्रातील सैनिक चतुराईने लपलेला आहे. या फोटोत बर्फाळ टेकडीचे दृश्य दिसत आहे. मात्र नॅशनल गार्डने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एक सैनिक लपलेला आहे.
Task for attention? Find the #sniper! ⬇️ pic.twitter.com/9UB0js7h7M
— НГУ (@ng_ukraine) January 17, 2023
या ऑप्टिकल भ्रमाचा सर्वात मनोरंजक भाग म्हणजे बर्फाच्या मध्यभागी लपलेला सैनिक शोधणे. त्यामुळे चित्रात लपलेला सैनिक फक्त उत्तम दृष्टी असणाऱ्यांनाच दिसू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
सैनिक शोधणे खूप अवघड वाटू शकते, परंतु चित्राच्या मध्यभागी बारकाईने पाहिले तर आपल्याला हा सैनिक बर्फात पडलेला दिसतो.