Video | खारुताई-मांजरीमध्ये जबरदस्त मारामारी, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच !
सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका खारूताईने मांजरीला जेरीस आणले आहे.
मुंबई : सोशल मीडियाचं जग काहीसं वेगळंच आहे. या जगात आपल्याला अनेक गोष्टी पाहायला आणि ऐकायला मिळतात. फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा समाजमाध्यमांवर अनेक प्रकारचे व्हिडीओ अपलोड केले जातात. याच कारणामुळे सोशल मीडियावरील वातावरण नेहमीच गरमागरम असतं. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका खारूताईने मांजरीला जेरीस आणले आहे. खारुताईची ही करामत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. (Squirrel and Cat funny fight went viral on social media)
खारुताईने मांजरीला जेरीस आणलं
सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात. मात्र, सध्या एक खारुताई आणि मांजरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये छोट्याशा खारुताईने मांजरीला जेरीस आणलं आहे. तिने मांजरीसोबत चांगलीच लढाई केली आहे.
व्हिडीओमध्ये काय आहे ?
या व्हिडीओमध्ये एक खार आणि मांजर दिसत आहे. या दोघांमध्ये चांगलीच लढाई लागलेली आहे. खारुताईने मांजरीवर हल्ला करण्यासाठी एक नामी शक्कल लढवली आहे. खारुताईने सुरुवातील मांजरीच्या तोंडावर हल्ला चढवला आहे. तोंडावर हल्ला केल्यामुळे मांजरीला काय करावे हे समजत नाहीये. मांजरीला काहीही दिसत नाहीये. हीच संधी साधत खारूताईने मोठी कामगिरी केली आहे. खारुताई थेट मांजरीच्या पाठीवर जाऊन बसली आहे. तसेच पाठीवर बसल्यानंतर खारुताईने मस्त सफर केली आहे.
पाहा व्हिडीओ :
‘डर के आगे जीत है’ pic.twitter.com/VqfsEXblC5
— @kumarayush (@kumarayush084) July 20, 2021
व्हिडीओमध्ये काय आहे ?
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून खारुताईची वाहवा करत आहेत. खारुताईने लावलेलं डोकं तसेच तिने मांजरीच्या पाठीवर बसून केलेली सफर लोकांना आवडली आहे. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही. मात्र हा व्हिडीओ @kumarayush या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
इतर बातम्या :
VIDEO: भारतीय अमेरिकन व्यक्तीकडून कारवर कोट्यावधींच्या सोन्याचा मुलामा, आनंद महिंद्रा म्हणतात…
Video | साप-मुंगुसाची थऱारक झुंज, प्रवासीही श्वास रोखून पाहत राहिले, पाहा व्हायरल व्हिडीओ
(Squirrel and Cat funny fight went viral on social media)