Viral Video : ‘इन्स्टा’साठी रस्त्याच्या मधोमध उभं राहून डान्स, लोक म्हणाले, मूर्खपणाची हद्द असते

श्रेया कालरा ( Shrya Kalara ) नावाच्या मुलीने शहरातील चौकात जे केलं, त्याचा व्हिडिओ आता व्हायरल ( Viral Video ) झाला आहे. श्रेयाने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ( Instagram Account ) हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Viral Video : 'इन्स्टा'साठी रस्त्याच्या मधोमध उभं राहून डान्स, लोक म्हणाले, मूर्खपणाची हद्द असते
Shreya Kalara Dance
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 5:00 PM

इंदुर: सोशल मीडियावर फेमस (Social Media) होण्यासाठी आजकाल तरुण काय करतील सांगता येत नाही, असंच काही वेगळं करण्याचा नाद इतरांनाही अडचणीत आणतो. आता ही मध्य प्रदेशातील इंदूरची ( Indore Madhya Pradesh) ही घटना बघा. श्रेया कालरा ( Shrya Kalara ) नावाच्या मुलीने शहरातील चौकात जे केलं, त्याचा व्हिडिओ आता व्हायरल ( Viral Video ) झाला आहे. श्रेयाने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ( Instagram Account ) हा व्हिडीओ शेअर केला आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, कृपया नियम तोडू नका. आता ही गोष्ट वेगळी, की व्हिडीओ बनवतानाच या बाईने नियमांचे तिनतेरा वाजवले. ( Standing in the middle of the street, Instagram influencer dances, video goes viral )

श्रेया कालराचा हा व्हिडीओ पाहल्यानंतर कळतं की, असंच धाडसी करणं तिला आवडतं. ज्यात चौकात नाचणंही येतं. डेअर पार्ट -3 नावाने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडीओत, आप श्रेयाला चौकात नाचताना पाहू शकतो. व्हिडिओच्या सुरुवातीला श्रेया एका जागी बसून चेहऱ्याचे वेगवेगळे हावभाव करुन हसताना दिसत आहे. मग श्रेया चौकाकडे धावते आणि काहीतरी डान्सच्या स्टेप्स करु लागते. चौकातील लोकांना श्रेयाला पाहून धक्काच बसतो. व्हिडिओमध्ये झूम करून एका व्यक्तीचे भावही दाखवले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shreya Kalra (@shreyakalraa)

श्रेया सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 19 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. श्रेया वेगवेगळ्या प्रकारचे चाळे करते, त्यामुळे लोकही तिला वेगवेगळे टास्क देतात.एका युजरने या पोस्टवर लिहलंय की, जर तुम्हाला हिंमत करायची असेल तर तुम्ही तुमच्या आई आणि वडिलांना सांगा की तुम्ही गर्भवती आहात आणि त्यांची रिएक्शन पाहा. असं असलं तरी अनेकजण श्रेयाच्या नव्या ट्रेंडचे कौतुकही करताना दिसतात. एका इन्स्टाग्राम युजरनं लिहिलं कि, तुझ्या कॉन्फिडन्स लेव्हसाठी हॅट्स ऑफ, तुझ्या नृत्याचा मी दिवाना आहे. तर अजून एका युजरनं लिहलं की, वेडेपणा करायचीही काहीतरी हद्द असते.

एकूणच काही का होईना, श्रेया तिच्या या व्हिडीओंमुळेच चांगलीच चर्चेत आहे. व्हिडीओ करताना ती नियम तोडते, ज्याबद्दल तिच्यावर कारवाई करण्याची मागणीही अनेक युजर करत आहेत. मात्र, तरीही तिच्या व्हिडीओंना लाखोंच्या घरात व्हुव्ज आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.