Video | भरधाव वेगात रेल्वे येताच महिलेने दिला जोराचा धक्का, प्रवाशाचं काय झालं ? अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

एका महिलेने रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या एक प्रवाशाला जोराचा धक्का देऊन त्याला रेल्वेसमोर ढकललं आहे. ही सर्व थरारक घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे.

Video | भरधाव वेगात रेल्वे येताच महिलेने दिला जोराचा धक्का, प्रवाशाचं काय झालं ? अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
RAILWAY STATION ACCIDENT VIRAL VIDEO
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 5:51 PM

मुंबई : जगात वेगवेगळ्या अपघातामध्ये रोज हजारो लोकांचा मृत्यू होतो. वाहनांची टक्कर होऊन प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना तर रोजच पाहायला मिळतात. रेल्वे अपघातामध्येही अनेक लोकांचा जीव जातो. काही लोक तर आत्महत्या करण्यासाठी रेल्वेच्या समोर येतात.  सध्या मात्र अमेरिकेच्या रेल्वे स्थानकावरील एक विचित्र प्रकार जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. येथे एका महिलेने रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या एक प्रवाशाला जोराचा धक्का देऊन त्याला रेल्वेसमोर ढकललं आहे. ही सर्व थरारक घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे.

महिलेने प्रवाशाला रेल्वेसमोर ढकललं 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाईम्स स्क्वेअर सब स्टेशन (Times Square Sub Station) येथील आहे. सोमवारी म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगाच थरकाप उडाला आहे. यामध्ये एका महिलेने समोर उभ्या असेलेल्या एका प्रवाशाला जोराचा धक्का दिला आहे. या जोराच्या धक्क्यामुळे प्रवाशी थेट रेल्वेसमोर गेला आहे. भरधाव वेगात आलेल्या रेल्वेसमोर प्रवाशाला ढकलल्यामुळे लोकांच्या अंगावर शहारे आले आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय थरारक आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रेल्वेस्थानकातील एका बेंचवर बसली आहे. तिच्या समोर एक प्रवाशी उभा आहे. तो स्पष्टपणे दिसत नाहीये. थोड्या वेळानंतर एक रेल्वे भरधाव वेगात प्लॅटफॉर्मवर आलेली आहे. रेल्वे आल्याचे दिसताच खाली बसलेली महिला अचानकपणे उभी राहिली आहे. तिने आपल्या समोर उभ्या असलेल्या प्रवाशाला जोराचा धक्का दिला आहे. मागून अचानकपणे धक्का दिल्यामुळे प्रवाशी पुरता गोंधळला आहे. काही समजायच्या आत तो समोरुन जात असलेल्या रेल्वेवर आदळलाय. भरधाव वेगात जात असलेल्या रेल्वेवर आदळल्यामुळे प्रवाशी चांगलाच जखमी झाला असून त्याला धक्का देऊन महिलेने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. तर दुसरीकडे या घटनेत प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही. मात्र धावत्या रेल्वेवर आदळल्यामुळे त्याच्या चेहऱ्याला मोठ्या जखमा झाल्या आहेत. या प्रवाशावर सध्या उपचार सुरु आहेत.

पाहा व्हिडीओ :

प्रवास करताना काळजी घ्या, नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्स 

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक झाले आहेत. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. आपण रेल्वेस्थानकावर बिनधास्तपणे वावरतो. काही लोक तर मोबाईल फोनवर मस्तपैकी बोलत असतात. कधीही काहीही घडू शकतं. त्यामुळे रेल्वेचा प्रवास करताना काळजी घ्यायला हवी, असे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

इतर बातम्या :

Video | शिकलेल्या सिंहाची सोशल मीडियावर चर्चा, निघाला सुलभ शौचालयातून बाहेर, व्हिडीओ व्हायरल

Video: लग्नाआधी मिशीला ताव, बायको समोर येताच नवऱ्याचं झालं मांजर, लग्नसोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल

बॉयफ्रेण्ड रोज मागवायचा मुलींचे कपडे, गर्लफ्रेण्डच्या शोधाशोधीनंतर धक्कादायक सत्य उजेडात

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.