ओहो! Helmet घालून डान्स, लोकं हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहतायत
नेटिझन्सना हा व्हिडिओ इतका आवडतोय की ते तो पुन्हा पुन्हा पाहत आहेत. प्रत्येकजण त्या मुलाच्या आत्मविश्वासाचे आणि त्याच्या आश्चर्यकारक नृत्याचे कौतुक करतायत.
इंटरनेटच्या ‘दुनिये’त कोणती मजेशीर गोष्ट पाहायला मिळेल याचा अंदाज बांधणे कठीण असते. हल्ली हेल्मेट घातलेल्या एका विद्यार्थ्याच्या डान्स व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नेटिझन्सना हा व्हिडिओ इतका आवडतोय की ते तो पुन्हा पुन्हा पाहत आहेत. प्रत्येकजण त्या मुलाच्या आत्मविश्वासाचे आणि त्याच्या आश्चर्यकारक नृत्याचे कौतुक करतायत. ही क्लिप काही सेकंदांचीच आहे, पण ती पाहिल्यानंतर तुम्हीही या हेल्मेटच्या विद्यार्थ्याचे फॅन व्हाल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वर्गात अनेक विद्यार्थी बसले आहेत. असे दिसते की त्यांचा ब्रेक टाईम सुरु आहे कारण इथे एकही शिक्षक उपस्थित नाही.
ब्रेक टाईमचा फायदा घेत हा विद्यार्थी हेल्मेट घालून नाचू लागतो, जेणेकरून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही तो कोणाच्याही ओळखीत येऊ शकत नाही.
पण हा विद्यार्थी मुलगा क्लिपमध्ये ज्या प्रकारचे डान्स मूव्ह्ज दाखवतो, ते खूप स्ट्राँग आहे. आम्हाला खात्री आहे की, तुम्हीही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहाल.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर फ्री अवर्स विथ हर्ष नावाच्या चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. काही सेकंदांची ही क्लिप धुमाकूळ घालतीये.
4 सप्टेंबर रोजी शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 10 मिलियन वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. सर्वजण मुलाच्या डान्सचं कौतुक करत आहेत.