एवढंच बाकी होतं! उत्तरपत्रिकेत गाणी लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकानेही दिलं तोडीस तोड उत्तर

दोन चित्रपटांमधली त्यांनी हिंदी चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, जेव्हा विद्यार्थ्याला प्रश्नांची उत्तरे समजली नाहीत, तेव्हा त्याने शिक्षकाला प्रभावित करण्यासाठी अनोख्या पद्धतीने कौतुक केले.

एवढंच बाकी होतं! उत्तरपत्रिकेत गाणी लिहिणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकानेही दिलं तोडीस तोड उत्तर
songs on answersheetImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 1:44 PM

अनेकदा असे दिसून आले आहे की जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत उत्तर समजत नाही तेव्हा तो एकतर उत्तरपत्रिका रिकामी सोडतो किंवा त्याऐवजी काहीतरी वेगळेच उत्तर लिहितो. पण हे बघा इथे एका विद्यार्थ्याने मर्यादाच ओलांडलीये. या विद्यार्थ्यानं आपली उत्तरपत्रिका फिल्मी गाण्यांनी भरून टाकलीये. ही उत्तरपत्रिका चंदीगड विद्यापीठातील एका विद्यार्थ्याची असल्याचा दावा केला जात आहे. ही उत्तरपत्रिका आता सोशल मीडियावर व्हायरल झालीये. विशेष म्हणजे यात शिक्षिकेने उत्तर दिले आहे, जे पाहण्यासारखे आहे. याला TV9 ने दुजोरा दिलेला नाही.

कथित उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने केवळ तीन प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यापैकी दोन चित्रपटांमधली त्यांनी हिंदी चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, जेव्हा विद्यार्थ्याला प्रश्नांची उत्तरे समजली नाहीत, तेव्हा त्याने शिक्षकाला प्रभावित करण्यासाठी अनोख्या पद्धतीने कौतुक केले.

पहिल्या रिप्लायमध्ये विद्यार्थ्याने थ्री इडियट्स चित्रपटातील ‘गिव्ह मी सम सनशाईन’ हे गाणे लिहिले. दुसरे उत्तर त्याने लिहिले, “तुम्ही एक उत्तम शिक्षक आहात. मी मेहनत घेतली नाही ही माझी चूक आहे. तर तिसऱ्या उत्तरात त्याने आमिर खानच्या पीके या चित्रपटातील गाणे लिहिले आहे. विद्यार्थ्याने उत्तरांऐवजी सगळीकडे गाणीच लिहिलेली आहेत. ही गाणी सुद्धा त्याने इतकी मन लावून लिहिलेली आहेत की वाचणारा सुद्धा खूप हसेल.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर cu_memes_cuians नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “शिक्षकाने काय उत्तर दिले यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा.” दोन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास 16 हजार लोकांनी लाइक केले आहे, तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

एकाने लिहिले की, ‘यात अनेक जण अपयशी ठरले. तर दुसरा म्हणतो, काहीही म्हणा… त्या विद्यार्थ्यांचं लिखाण अप्रतिम आहे. आणखी एका युजरने लिहिले की, ‘हा चौथ्या सेमिस्टरपर्यंत कसा पोहोचला. आणखी एका युजरने लिहिले की, “मग लोक म्हणतात की भारतात नोकऱ्या नाहीत.”

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.