व्वा! हा व्हिडीओ बघा, एवढीशी पोरं, कसं जमतं? व्हायरल व्हिडीओ
वेगवेगळ्या गोष्टी आता वेगवेगळ्या पद्धतीने शाळेत शिकविल्या जातात.
शाळेत मुलांना शिकवायच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. पूर्वीसारख्या शाळा आता राहिल्या नाहीत. वेगवेगळ्या गोष्टी आता वेगवेगळ्या पद्धतीने शाळेत शिकविल्या जातात. तुम्ही लहान असताना तुम्हाला शाळेत कधी भेलपुरी शिकवली होती का बनवायला? हा व्हिडीओ व्हायरल झालाय ज्यात एका शाळेत मुलांना भेलपुरी बनवायला शिकवली जातीये. दोन गोष्टींसाठी हा व्हिडीओ आपल्याला खूप भावतो. एकतर शाळेत भेलपुरी शिकवलीये आणि दुसरं म्हणजे ती एकदम अनोख्या पद्धतीने शिकवलीये. इतकी हटके पद्धत बघून तर तुम्हाला सुद्धा नक्की लक्षात राहील भेलपुरी बनवतात कशी.
भेलपुरी हा एक मसालेदार नाश्ता आहे. जो तुम्हाला मुंबईच्या कोणत्याही गल्लीत सहज खायला मिळेल. हे विद्यार्थी जेव्हा हे बनवायला लागतात तेव्हा तुमच्याही तोंडाला पाणी सुटतं.
अभ्यासात मसाल्यांची इंग्रजी नावं आहेत. जी शिकण्यासाठी मुलांचे हे प्रयत्न सुरु आहेत. अशा हटके पद्धतीने मुलांना शिकवलं जातंय म्हणजे त्यांना मसाल्यांची इंग्रजी नावं लक्षात राहतील.
या व्हिडीओमध्ये काही शाळकरी मुलं तिखट भेळपुरी बनवताना दिसतायत. एकेकाच्या हातात एक एक पदार्थ आहे जो एक एक करून मिक्स केला जातोय. आधी ही मुलं पदार्थाची इंग्रजी नावं घेतात आणि मग ती त्या भांड्यात टाकून मिक्स करतात.
व्हिडीओ
View this post on Instagram
एका मोठ्या भांड्यात कांदा आणि टोमॅटोमध्ये, मुरमुरे असं सगळं टाकलं जातंय. नंतर कुणी मिरची घातली तर कुणी लिंबू पिळून टाकलंय.हे सगळं इंग्रजीत नावं घेत घेत चालू आहे.
लहान मुलांना शिकवणं खूप कठीण असतं. त्यांना पटकन काही आठवत नाही, पण तीच गोष्ट खेळात शिकवली तर ती मुलांच्या डोक्यात पटकन घुसते.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर rjf.nagriksattamumbai नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘व्वा ही भेळ किती रुचकर दिसते. भेलपुरी बनवण्याचा हा उपक्रम इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी केला होता.”