स्टंट पडला महागात, एका चुकीने बनला ‘हिरो से झिरो’!
Stunt gone wrong: अनेकदा अशा घटना घडल्या आहेत ज्यात व्हिडिओ बनवताना लोकांचे प्राण सुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडिओ शूट करताना दिसतात, पण काही वेळा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.
मुंबई: सोशल मीडियावर व्हिडिओ आणि रिल्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण व्हिडिओ बनवण्याच्या नादात अनेक जण आपला जीव धोक्यात घालतात. अनेकदा अशा घटना घडल्या आहेत ज्यात व्हिडिओ बनवताना लोकांचे प्राण सुद्धा गमवावे लागलेले आहेत. रेल्वे रुळांवर, समुद्रात, चालत्या ट्रेनमध्ये, चालत्या बाईकवर किंवा कारवर लोक स्टंट व्हिडिओ शूट करताना दिसतात, पण काही वेळा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.
आजच्या काळाला सोशल मीडियाचा जमाना म्हटले तर काहीही चुकीचे होणार नाही आणि इथे प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करायला तयार आहे. अनेक जण तर आपल्या जीवाशीही खेळतात. विशेषत: तरुणांमध्ये हे वेड अधिक दिसून येते. हे लोक चित्रपटामुळे प्रभावित होतात आणि कधीकधी स्टंट करतात. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. जिथे एक व्यक्ती एका कठड्यावर स्टंट करताना दिसला, पण त्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ते खरंच धक्कादायक आहे.
— Out of Context Human Race (@NoContextHumans) June 21, 2023
व्हायरल होत असलेल्या या धोकादायक व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दरीच्या काठावर उभं राहून मागच्या बाजूला उडी मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सभोवतालच्या पर्यटकांना पहिल्यांदा बघताना खूप भारी वाटतं पण नंतर ती व्यक्ती स्टंट मारताना खाली पडते. त्याच्या एका चुकीमुळे तो थेट खड्ड्यात पडतो. तो ज्या पद्धतीने पडला त्याला झालेली दुखापत किती भयंकर असावी हे व्हिडिओ पाहिल्यावर समजू शकते. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.