ट्रेन पटरीवर येताच मुलगा झोपला, त्यानंतर जो थरार घडला ते पाहून ह्रदयाचे ठोके काही क्षण थांबणार, व्हिडिओ व्हायरल
Train Viral Video: व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर लक्ष वेधण्यासाठी बनवला गेला आहे. त्या मुलाने रेल्वे रुळावर पडून आपला जीव धोक्यात घातला. त्याच्या एका छोट्याशा चुकीमुळे त्याला आपला जीव गमवावा लागला असता.
Train Viral Video: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येत असतात. त्यातील काही व्हिडिओ चांगलेच व्हायरल होतात. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ पाहिल्यावर ह्रदयाचे ठोके काही क्षण थांबतात. काही सेंकदाचा असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा रेल्वे ट्रॅकच्या मधोमध झोपला आहे. त्यानंतर वेगाने येणारी गाडी त्याच्यावरुन जाताना दिसत आहे. रेल्वे जात असताना तो पटरीवर शांतपणे पडलेला असतो. रेल्वे गेल्यानंतर तो आनंदाने ट्रॅकवर उभा राहतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी इशारा दिला आहे. मनोरंजनासाठी असा धोकादायक प्रकार करु नका, असे म्हटले आहे.
सोशल मीडियासाठी बनवला व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर लक्ष वेधण्यासाठी बनवला गेला आहे. त्या मुलाने रेल्वे रुळावर पडून आपला जीव धोक्यात घातला. त्याच्या एका छोट्याशा चुकीमुळे त्याला आपला जीव गमवावा लागला असता. रेल्वे इतकी वेगात होती की त्याच्यावरून गेल्याचा तो क्षण श्वास रोखून पाहिल्यासारखा वाटतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी त्याच्या मूर्खपणाबद्दल सुनावले आहे.
Clown's on Railway Track🤡 pic.twitter.com/WHLzW6M8F8
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) December 3, 2024
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रियाही आल्या आहेत. @gharkekalesh नावाच्या X हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. त्यावर शेकडो जणांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, ‘हे लोक काही फॉलोअर्स मिळवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात.’
आणखी एका यूजरने लिहिले की, ‘असे स्टंट करणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकले पाहिजे.’ अनेक युजर म्हणतात की, या लोकांना आपला जीव धोक्यात घालणारे साहस सोशल मीडियासाठी करु नये, हे समजवण्याची गरज आहे. पोलिसांनी या लोकांवर कारवाई केली पाहिजे, असे काही जणांनी म्हटले आहे.