चहा विकून तो झाला करोडपती; Video पाहुन नाही बसणार विश्वास
Crorepati Chaiwala : नागपूरचा डॉली चहावाला तर जगात लोकप्रिय झाला. बिल गेट्सपासून तर त्याचे अनेक फॅन्स आहेत. पण कोट्याधीश चहावाला आपल्या देशात कोणत्या शहरात राहतो, तुम्हाला माहिती आहे का? सध्या हा कोट्याधीश चहावाला पण सोशल मीडियावर भाव खात आहे.
कोणतेच काम लहान वा मोठे नसते. काम हे काम असते. समाजात भाजीपाला विक्री करणे अथवा चहा विक्री करणे या कामाला फारशी प्रतिष्ठा नाही. चहाला मात्र किंमत आहे. नागपूरच्या Dolly Chaiwala ने त्याची एक वेगळी क्रेझ निर्माण केली आहे. बिल गेट्स सुद्धा त्याच्या स्टाईलवर फिदा झाले आहेत. पण देशात एक करोडपती चहावाला आहे, हे सांगून सुद्धा तुम्हाला पटणार नाही. कारण या माणसाला फार कमी लोक ओळखतात. तो परदेशात फिरायला जातो. चांगली कमाई करतो. त्याच्याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झाला आहे. जाणून घ्या हा करोडपती चहावाला कोणत्या शहरात राहतो.
विश्वास ठेवणार कसा?
तर या व्हिडिओत तुम्हाला हाफ पँट, टी-शर्ट घातलेले दोन व्यक्ती त्यांच्या ठेल्यासह येताना दिसतील. या ठेल्यावर चहा तयार करण्याचे सर्व साहित्य तुम्हाला दिसेल. त्यानंतर हे दोन तरुण या ठेल्यावरुन सर्व सामान हळूहळू खाली उरवतात. ठेल्यावर आता चहासाठीची तयारी सुरु होताना दिसते. एका मोठ्या भांड्यात चहा तयार करण्याची कवायत सुरु होते.
चहा पिणाऱ्यांची हळूहळू गर्दी जमा होते. अनेक प्रकारचे मसाले या चहाच्या भांड्यात पडतात आणि त्यांचा रंग दाखवतात. एक अनामिक सुगंध या परिसरात पसरतो. चहाला एक खास रंग चढतो. एक-एक काचेचे ग्लास, कपात हे पेय ओतल्या जाते. लोक पहिल्याच घोटाला वा, वा, क्या बात है अशी मनमुराद दाद देतात. सुदामा चहावाला, असे या जादुई चहा तयार करणाऱ्याचे नाव आहे. त्याला करोडपती चहावाला म्हणून पण ओळखतात. त्याच्या चहाचा स्वाद अनेकजण लाजबाब असल्याचा दावा करतात.
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर
या सुदाम चहावाल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम liveforfood007 नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 4.7 दशलक्ष म्हणजे 47 लाख वेळा पाहण्यात आले आहे. तर एक लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. त्यावर कमेंटचा तर पाऊस पडला आहे.
View this post on Instagram
दिवसाचे 20-30 हजार कुठेच गेले नाही
एका युझरने या व्हिडिओवर कमेंट केली आहे, ” दिवसाला हा चहावाला 20-30 हजार रुपये सहज कमावत असेल.” तर दुसऱ्या एका युझरने लिहिले आहे की, मी पण आता चहा विकेल आणि लोकप्रिय होईल. हे लोक इतकी कमाई करुन सुद्धा स्वच्छतेकडे दुर्लक्ष का करतात बरं, आता तिथे किती घाण आहे, ते पहा, असा अभिप्राय एका युझरने दिला आहे. चहा विक्री करुन हा माणून करोडपती झाला, यावर विश्वास बसत नसल्याचे एका युझरने म्हटले आहे.