सुधा मूर्तींनी डान्स केलेला पाहिलात का? “आयुष्य जगावं तर असं!” असंच म्हणाल
हा व्हिडीओ पाहिला की कळून येतं की माणूस कितीही मोठा असो, कितीही श्रीमंत असो आयुष्य जगताना या सगळ्याचा भार त्या आयुष्य जगण्यावर नसावा.
नवी दिल्ली: भारतीय शिक्षक, लेखिका आणि समाजसेविका इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सुधा मूर्ती खूप छान नाचल्यात. सुधा मूर्ती आपल्या मुलाखतीतून नेहमीच “आयुष्य कसं जगावं” हे सांगत असतात. हा व्हिडीओ पाहिला की कळून येतं की माणूस कितीही मोठा असो, कितीही श्रीमंत असो आयुष्य जगताना या सगळ्याचा भार त्या आयुष्य जगण्यावर नसावा. सुधा मूर्ती कसलाही विचार न करता मनसोक्त गाण्यावर थिरकताना दिसतात.
बुधवारी बंगळुरूच्या मुख्यालयात नुकत्याच पार पडलेल्या इन्फोसिसच्या 40 व्या वर्धापनदिना निमित्त सुधा मूर्तींनी खूप मजा केली.
या व्हिडिओमध्ये श्रेया घोषालसोबत सुधा मूर्ती आणि इतर कर्मचारी दिसतात. प्रत्येकजण गुरु चित्रपटातील “बरसो रे मेघ मेघा मेघा” गाण्यावर थिरकायला सुरु करतो.
Someone just sent this to me. Sudha Murty dancing and singing with @shreyaghoshal as part of the #Infy4Decades celebration in Bengaluru last night. Wholesome ? pic.twitter.com/I17Ns49qDR
— Chandra R. Srikanth (@chandrarsrikant) December 15, 2022
मेलडी क्वीन श्रेया घोषालनेसुद्धा हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. सुधा मूर्ती नेहमीप्रमाणेच तुमचं मन जिंकतील असा आमचा विश्वास आहे.
दरम्यान, आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी इन्फोसिसने आपला 40 वा वर्धापनदिन साजरा केला. हा वर्धापन दिन बंगळुरू मुख्यालयात जल्लोषात साजरा करण्यात आलाय. यावेळी एन.आर.नारायण मूर्ती, नंदन एम. नीलेकणी, एस. गोपालकृष्णन, एस. डी. शिबुलाल आणि के. दिनेश उपस्थित आहे.