‘भाऊ, तू Google चा सीईओ झाला, पण तरीही…’, सुंदर पिचाई यांच्या या पोस्टवर युझर्संनी अशी घेतली फिरकी, हसू नाही आवरणार

Sunder Pichai : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आणि समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली. या पोस्टवर युझर्सनी पण कमेंटचा पाऊस पाडला. भारतीय आई-वडिलांची इच्छा आणि मुलांच्या प्रगतीची ही पोस्ट तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही.

'भाऊ, तू Google चा सीईओ झाला, पण तरीही...', सुंदर पिचाई यांच्या या पोस्टवर युझर्संनी अशी घेतली फिरकी, हसू नाही आवरणार
गुगल सीईओ सुंदर पिचाई
Follow us
| Updated on: Jul 27, 2024 | 12:12 PM

भारतात तुम्ही किती पण यश मिळवा पण आई-वडिलांच्या तुमच्याकडून काही ना काही अपेक्षा असतातच. मुलांकडून अपेक्षा ठेवणे हे भारतीय समाजात वावगं मानण्यात येत नाही. तुम्ही बड्या कंपनीत घसघशीत पगारावर काम करत असाल तरी आई-वडिलांचा हेका असतोच की मुलगा सरकारी नोकरीत असता तर अजून चांगलं झालं असतं. त्याला कुटुंबियांना निदान वेळ तरी देता आला असता. सरकारी नोकरी करणाऱ्यांना त्यांचे आई-वडील सल्ला देतात की, तू शिक्षक असता तर डोक्याला फारसा ताप नसता. तर सुंदर पिचाई यांच्या एका पोस्टमुळे भारतीय समाजाची ही मिष्कील बाजू समोर आली. पिचाई यांनी इन्स्टाग्रामवर याविषयीची एक पोस्ट केली. त्यावर कमेंटचा पाऊस पडला आहे.

पिचाई यांची यशोगाथा

हे सुद्धा वाचा

पिचाई यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. त्यात आयआयटी खरगपूरमधून डॉक्टरेट मिळवल्याचे त्यांनी शेअर केले. गेल्या आठवड्यात त्यांनी हे यश मिळवले. आपल्याला डॉक्टरेट पदवी मिळावी अशीच आपल्या आई-वडिलांची इच्छा होती असे पिचाई यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यांनी इस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांच्या भावना आणि आई-वडिलांची इच्छा यांचा उल्लेख केला आहे.

आयआयटीमधील तंत्रज्ञानातील शिक्षणामुळे आपण गुगलपर्यंतचा टप्पा गाठल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोहचवण्याची वकिली त्यांनी केली. AI या तंत्रज्ञानामुळे आता आयआयटीची भूमिका महत्वपूर्ण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी आयआयटीमधील आठवणी ताज्या करत, त्या दिवसांबद्दल सर्वांचे आभार मानले.

युझर्सच्या कमेंटचा पाऊस

पिचाई यांच्या या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. काही लोकांनी त्यावर मजेशीर कमेंट केल्या. काहींनी त्यांना विचारले की आम्ही आता डॉक्टर गुगल सुरु करावे का? तर एका युझर्सची कमेंट खूप चर्चेत आली. भाऊ, तू Google चा सीईओ झाला, पण तरीही आई-वडील काही खूष झाले नाहीत. त्यांच्या इच्छे खातर पिचाई यांनी डॉक्टरेट मिळवल्याचे युझर्सने सांगितले. तर एकाने ये पॅरेंट्स मांगे मोर, अशी कमेंट टाकून खसखस पिकवली.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....