सचिन तेंडुलकरच्या नावाने रेल्वे स्टेशन? जाणून घ्या, सुनील गावस्करांच्या ‘त्या’ फोटोमागील सत्य

सुनील गावस्कर यांनी 'सचिन' या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यात सुरुवात केली. सचिन तेंडुलकरनेही त्यावर कमेंट केली आहे. मात्र ते स्थानक खरंच सचिन तेंडुलकरच्या नावावरून देण्यात आलंय का, ते जाणून घेऊयात..

सचिन तेंडुलकरच्या नावाने रेल्वे स्टेशन? जाणून घ्या, सुनील गावस्करांच्या 'त्या' फोटोमागील सत्य
Sunil Gavaskar poses at Sachin railway stationImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 1:55 PM

मुंबई : 30 नोव्हेंबर 2023 | माजी क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम ओपनिंग बॅट्समन म्हणून ओळखले जाणारे सुनील गावस्कर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका रेल्वे स्थानकाचा फोटो पोस्ट केला. सध्या या फोटोची तुफान चर्चा होत आहे. कारण ज्या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर उभं राहून गावस्कर यांनी फोटो काढला आहे, त्याचं नाव सचिन असं आहे. त्यांच्या या फोटोवर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही कमेंट केली आहे. गावस्कर यांचा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी ‘सचिन’ या रेल्वे स्थानकाविषयी कुतूहल व्यक्त केलं. सचिन या रेल्वे स्थानकाचं नाव सचिन तेंडुलकरवरून देण्यात आलं आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

गावस्कर यांनी पोस्ट केलेला फोटो

या फोटोमध्ये सुनील गावस्कर हे रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभे असल्याचं दिसत आहे. प्लॅटफॉर्मवर मोठ्या अक्षरात लिहिलेल्या ‘सचिन’ या नावाकडे ते बोट दाखवत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘गेल्या शतकातील लोकांची किती दूरदृष्टी होती. त्यांनी सुरतजवळच्या एका रेल्वे स्थानकाचं नाव क्रिकेटमधील सर्वांत महान खेळाडूंपैकी एकाचं दिलं आहे. तो माझा सर्वांत आवडता क्रिकेटर तर आहेच पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ती व्यक्ती माझी सर्वांत आवडती आहे.’ सुनील गावस्कर यांच्या या फोटोवर सचिननेही कमेंट केली. ‘गावस्कर सर, तुमचे हे शब्द माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. सचिन याठिकाणचं वातावरण खूप सुंदर असल्याचं पाहून मला आनंद झाला’, असं तेंडुलकरने लिहिलं.

हे सुद्धा वाचा

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या फोटोवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हे स्टेशन माझ्या गावापासून फक्त 20 किलोमीटर दूर आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘तुम्ही तिथे काय करत आहात? तिथे फक्त लोकल ट्रेन थांबतात, एक्स्प्रेस नाही. ते खूप छोटं स्टेशन आहे’, असं दुसऱ्याने गावस्कर यांना विचारलंय. आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय, ‘ते माझं गाव आहे आणि त्याचं नाव सचिन तेंडुलकरच्या नावावरून देण्यात आलेलं नाही.’

फॅक्ट चेक

गुजरातमधील सुरतजवळ ‘सचिन’ या नावाने रेल्वे स्थानक आहे. पण या रेल्वे स्थानकाचं नाव सचिनवरून देण्यात आलेलं नाही. कारण सचिनच्या जन्माच्या खूप आधीपासून हे रेल्वे स्थानक त्या नावाने तिथे आहे. विशेष म्हणजे कोहली या नावानेही एक रेल्वे स्थानक आहे. महाराष्ट्रातील नागपुरातल्या एका रेल्वे स्थानकाचं नाव ‘कोहली’ असं आहे. हे नावसुद्धा विराट कोहलीच्या नावावरून देण्यात आलेलं नाही.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....