Self Defense Method: समजा हत्ती अंगावर धावून आलाच तर काय करायचं? हा सेल्फ डिफेन्सचा व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओमध्ये एक हत्ती आरामात फिरताना दिसत आहे. पण अचानक समोर दोन लोकांना पाहून हत्ती हिंसक होतो आणि दोघेही हल्ला करण्यासाठी धाव घेतात. यानंतर काय झालं हे जाणून घेण्यासाठी आधी हा व्हायरल व्हिडिओ पाहायलाच हवा...
Self Defense Method: डिस्कव्हरी चॅनल्समध्ये (Discovery Channel) तुम्ही अनेकदा जंगली प्राण्यांना जंगलात दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करताना पाहिलं असेल. पण या व्हिडिओमध्ये (Viral Video) एका हत्तीनं दोन जणांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. मग अचानक दोघांनीही असं काही केलं की हत्ती शांत झाला आणि लोकांना आश्चर्य वाटलं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुरुवातीला तुम्हालाही भीती वाटेल की, हत्तीच्या धोकादायक हल्ल्यातून हे दोघे कसे बचावतील. व्हिडिओमध्ये जे काही घडले त्यावर विश्वास ठेवणे खरोखर कठीण आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्ती (Elephant Video) आरामात फिरताना दिसत आहे. पण अचानक समोर दोन लोकांना पाहून हत्ती हिंसक होतो आणि दोघेही हल्ला करण्यासाठी धाव घेतात. यानंतर काय झालं हे जाणून घेण्यासाठी आधी हा व्हायरल व्हिडिओ पाहायलाच हवा…
व्हिडिओ
Not panicking is the best self-defense method!
— Figen (@TheFigen) July 26, 2022
हल्ला टाळण्यासाठी एक अनोखा मार्ग
या धोकादायक प्राण्याचा हल्ला टाळण्यासाठी दोघांनीही एक अनोखा मार्ग अवलंबला. दोघेही अजिबात घाबरले नाहीत आणि मूर्तीसारखे उभे राहिले. हे पाहून हत्तीने हल्ला केला नाही तर उलट्या पायावर परतायला सुरुवात केली. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की घाबरू नका, न घाबरता परिस्थितीचा सामना करणे हा स्वरक्षणाचा उत्तम मार्ग आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल. जर आपण संकटकाळी न घाबरता, न आरडाओरडा करता, शांत चित्ताने संकटाचा सामना केला तर आपण त्या संकटातून बाहेर पडू शकतो हाच संदेश हा व्हिडीओ देतो.
व्हिडिओ ट्विटरवर शेअर
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काहींनी हत्ती हातात बंदूक पाहून परत आल्याचा अंदाज बांधला, तर काहींनी हे दोघे जण खूप धाडसी असल्याचं सांगितलं. हा व्हिडिओ आतापर्यंत 20 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. याला 94 हजारांहून अधिक लोकांनी (सोशल मीडिया युजर्स) लाईक केले असून 12 हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे.