माश्याचा 1 इंचाचा काटा गिळणं जीवावर बेतलं, धक्कादायक मृत्यू! व्हायरल
त्याचबरोबर अशी प्रकरणं लवकर कळली तर उपचार शक्य असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. पण, उपचाराला उशीर झाला तर रुग्ण दगावूही शकतो.
एका माणसाने चुकून 1 इंच लांबीचे माश्याचा काटा गिळला. या काट्यामुळे त्याच्या आतड्याला भोक पडले आणि तो धोकादायक संसर्गाचा बळी ठरला. हा संसर्ग जीवघेणा ठरला आणि रुग्णाचा मृत्यू झाला. श्रीलंकेत ही घटना उघडकीस आलीये. माशाचा काटा खाल्ल्याने झालेला मृत्यू इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरी केस रिपोर्टमध्ये प्रसिद्ध झालाय. श्रीलंकेचा रहिवासी असलेला हा रुग्ण 60 वर्षांचा होता. या व्यक्तीला वेदना, उलट्या, बद्धकोष्ठता आणि वाढलेले पोट यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यांची प्रकृती पाहून त्याला ‘इंटेन्सिव्ह केअर’मध्ये दाखल करण्यात आले. अनेक तपासण्या झाल्या, या अहवालातून त्याच्या पोटात द्रव भरल्याचे समोर आले. जेव्हा मूत्रपिंड काम करणे थांबते तेव्हा अशी लक्षणे उद्भवतात. हे ‘सेप्सिस’चे लक्षण आहे. सेप्सिसमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अवयवांवर हल्ला करते.
यानंतर रुग्णाचं ऑपरेशन तब्बल दोन तास चाललं, आतड्यात एक छोटं छिद्र असल्याचं समोर आलं. तपास केला असता 1 इंचचा माशाचा काटा गिळल्याने हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले.
रुग्णाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी आतड्याचा संसर्ग झालेला भाग काढून टाकला. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णाचा मृत्यू झाला.
त्याचबरोबर अशी प्रकरणं लवकर कळली तर उपचार शक्य असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. पण, उपचाराला उशीर झाला तर रुग्ण दगावूही शकतो.