IND vs PAK सामन्यापूर्वी Zomato ने पाकिस्तानला केलं ट्रोल, ट्वीट करत विचारलं पिझ्झा-बर्गर हवाय का?

T-20 विश्वचषक 2021 च्या सर्वात मोठ्या सामन्यात आज पाकिस्तानचा सामना टीम इंडियाशी होणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. जेव्हा जेव्हा दोन्ही संघ क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर असतात, तेव्हा प्रेक्षकांचा उत्साहही शिगेला पोहोचतो. आपल्याला आठवतं का, जेव्हा आपण शेवटच्या वेळी विश्वचषकात पाकिस्तानला भेटलो होतो, तेव्हा शेजारच्या संघाचा कर्णधार सरफराज मैदानावर जांभई देत होता.

IND vs PAK सामन्यापूर्वी Zomato ने पाकिस्तानला केलं ट्रोल, ट्वीट करत विचारलं पिझ्झा-बर्गर हवाय का?
IND vs PAK Viral
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 12:51 PM

मुंबई : T-20 विश्वचषक 2021 च्या सर्वात मोठ्या सामन्यात आज पाकिस्तानचा सामना टीम इंडियाशी होणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. जेव्हा जेव्हा दोन्ही संघ क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर असतात, तेव्हा प्रेक्षकांचा उत्साहही शिगेला पोहोचतो. आपल्याला आठवतं का, जेव्हा आपण शेवटच्या वेळी विश्वचषकात पाकिस्तानला भेटलो होतो, तेव्हा शेजारच्या संघाचा कर्णधार सरफराज मैदानावर जांभई देत होता. तपासाअंती असे आढळून आले की, पाकिस्तानचा संघ सामन्याच्या आदल्या रात्री बर्गर आणि पिझ्झा खाऊन आले होते. यासाठी झोमॅटोने पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवली आहे.

सामन्याच्या आदल्या रात्री झोमॅटोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पाकिस्तानला टॅग केले आणि लिहिले, ‘तुम्हाला पिझ्झा आणि बर्गर हवा असल्यास तुम्ही आमच्याशी थेट संपर्क साधू शकता.’

झोमॅटोचे हे ट्विट सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले आहेत. ज्यावर भारतीय चाहतेही पाकिस्तानची फीरकी घेऊ लागले आहेत. या ट्विटवर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स बनवून आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.

भारतीय चाहत्यांनी पाकिस्तान्यांना टोमणे मारण्याची ही शैली लोकांना खूप आवडत आहे. अनेक वापरकर्त्यांनी मजेदार कमेंट्स आणि मीम्स शेअर केले आहेत. मीम शेअर करताना एका यूजरने लिहिले की, ‘जर त्यांच्याकडे विष खायला पैसे नाहीत, तर ते चांगले बर्गर आणि पिझ्झा कुठून खातील.

T-20 विश्वचषक दुबईमध्ये सुरु झाला आहे. भारत 24 ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी आहे. हा सामना संध्याकाळी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.

संबंधित बातम्या :

Video: भारत-पाकिस्तान मॅचआधी मौका-मौकाची जाहिरात, भारतीय नेटकऱ्यांकडून व्हिडीओ व्हायरल

Video: “भाई, मुझे मारो” म्हणणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटप्रेमीचा नवा व्हिडीओ, नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद

'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.