पॉर्न वेबसाईटवर गणिताचे लेक्चर घेऊन वर्षाला 2 कोटींची कमाई, तैवानच्या शिक्षकाची सोशल मीडियावर चर्चा
गणित शिकवणारा हा शिक्षक त्याच्या लेक्चरचे व्हिडिओ पॉर्न वेबसाइटवर अपलोड करतो. आतापर्यंत त्याने 200 हून अधिक व्हिडिओ अपलोड केले आहेत.
प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय मनोरंजक आणि मजेदार पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतो. तैवानच्या एका शिक्षिकेने एक पाऊल पुढे टाकत मुलांना शिकवण्याचा विचित्र मार्ग स्वीकारला आहे. गणित शिकवणारा हा शिक्षक त्याच्या लेक्चरचे व्हिडिओ पॉर्न वेबसाइटवर अपलोड करतो. आतापर्यंत त्याने 200 हून अधिक व्हिडिओ अपलोड केले आहेत. आणि ऐकल्यावर कदाचित धक्का बसेल, पण पॉर्न वेबसाईटवर लेक्चर अपलोड करुन हे महाशय वर्षाकाठी तब्बल 2 कोटी रुपयांहून अधिक कमावतात. (Taiwan Maths teacher uses Pornhub to give Maths lessons, earns around Rs 2 crore per year)
15 वर्षांपासून गणिताची शिकवणी
चांग्सू नावाच्या या शिक्षकाने गणितात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. 15 वर्षांपासून तो ऑनलाइन आणि तैवानच्या शाळांमध्ये शिकवतो. पूर्वी तो ऑनलाइन क्लासेससाठी यूट्यूबवर अवलंबून होता, पण गेल्या वर्षी त्याने पॉर्न वेबसाईटवर काही लेक्चरचे व्हिडीओ अपलोड करुन क्लास घेण्याचं ठरवले.
पॉर्न साईट्सवर गणित शिकवण्याचा प्रयोग
शिक्षक चांगसू म्हणातात की, ‘अॅडल्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर खूप कमी लोक गणित शिकवतात आणि या प्लॅटफॉर्मवर बरेच लोक पॉर्न व्हिडिओ पाहतात, मला वाटलं की, जर मी माझे व्हिडिओ तिथं अपलोड केले तर बरेच लोक त्याचा फायदा घेतील.’
गणिताच्या लेक्चरमधून किती कमाई?
सध्या चांगसूचे ‘चांगसुमथ 666’ नावाचे पॉर्नहब चॅनल आहे. तो म्हणाला: ‘अनेक विद्यार्थी ज्यांना गणित शिकवण्यासाठी शिक्षकाची गरज आहे, ते मला पॉर्न वेबसाईटद्वारे ओळखतात आणि त्यांच्यापैकी काही माझे अभ्यासक्रम विकत घेतात.’ चांगसू दरमहा अभ्यासक्रम विकून 7,500,000 नवीन तैवान डॉलर्स (अंदाजे 1.88 कोटी रुपये) कमावतो, म्हणजेच महिन्याला सुमारे 15 लाख रुपये.
चांगसूने कबूल केले की त्याला ‘पॉर्न वेबसाईटवर गणित शिकवायचे नव्हते’, पण, पॉर्न वेबसाईट्सवर आता तो विद्यार्थी घडवत आहे, याचा त्याला आनंद आहे.
हेही पाहा: