AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मजुरांचं पोट भरावं म्हणून विकते 1 रुपयाला इडली, लवकरच मिळणार हक्काचं घर, आनंद महिंद्रा मदत करणार

आनंद महिंद्रा अम्माला घऱ खरेदी देण्यास मदत करणार आहेत. तशी माहिती आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन दिली आहे. (tamilnadu idli amma anand mahindra)

मजुरांचं पोट भरावं म्हणून विकते 1 रुपयाला इडली, लवकरच मिळणार हक्काचं घर, आनंद महिंद्रा मदत करणार
इडली अम्मा आणि आनंद महिंद्रा
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 1:00 PM

मुंबई : तुम्ही शोशल मीडियावर सक्रिय असाल तर इडली तयार करणारी ‘इडली वाली अम्मा’ सगळ्यांनाच माहिती असेल. मजुरांना पोटभरुन जेवण मिळावे म्हणून त्या आपली इडली फक्त 1 रुपयाला विकतात. त्यांच्या या कामाची दखल थेट उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली आहे. आनंद महिंद्रा अम्माला घऱ खरेदी करण्यास मदत करणार आहेत. तशी माहिती आनंद महिंद्रा ( Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन दिली आहे. एक रुपयाला इडली विकणाऱ्या अम्मा (Idli Amma) सध्या 85 वर्षांच्या आहेत. आनंद महिंद्रा यांनी अम्माच्या उद्योगात गुंतवणूक करण्याची इच्छा 2019 साली व्यक्त केली होती. तेव्हापासून आनंद महिंद्रा अम्माला मदत करत आहेत.  (Tamilnadu Idli Amma will get her own house and workspace Anand Mahindra will help her)

लवकरच हक्काचे घर मिळणार

इडली तयार करणाऱ्या अम्माचं खरं नाव कमलाथल असं आहे. त्यांना लवकरच त्यांचे हक्काचे घर मिळणार आहे. महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी त्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. आनंद महिंद्रा यांच्या या निर्णयामुळे अम्मा चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

लवकर घराच्या बांधणीला सुरुवात

फक्त 1 रुपयाला इडली विकणाऱ्या अम्माविषयी आनंद महिंद्रा यांनी 10 सप्टेंबर 2019 रोजी ट्विट केले होते. त्यांनी या अम्मांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आनंद महिंद्रा यांच्या ट्विट नंतर कोयंबतूर येथील भारत गॅसने अम्मा यांना स्वत:हून गॅसचे कनेक्शन दिले होते. त्यावेली गॅस कंपनीचे महिंद्रा यांनी आभार मानले होते. तसेच यावेळी अम्मा यांना आणखी कशा प्रकारे मदत करता येऊ शकते याची चाचपणी महिंद्रा ग्रुपने केली होती. अम्मा यांच्याकडे चौकशी केल्यानंतर सध्यातरी मला राहण्यासाठी तसेच काम करण्यासाठी एक घर हवे असल्याचे अम्मा यांनी सांगितले. त्यानंतर लगेचच महिंद्रा ग्रुपने सूत्र हालवत अम्मा यांच्या घरासाठी तजविज केली. अम्मा यांना आता लवकरच हक्काचं घर मिळणार आहे. महिंद्रा ग्रुपच्या रियल ईस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ब्रांच महिंद्रा लाईफस्पेस तर्फे लवकरच कमलाथल अम्माच्या घराची बांधणी होणार आहे.

इतर बातम्या :

व्हॉट्सअपच्या मनमानीनंतर आनंद महिंद्रा, विजय शेखर यांच्यासह या दिग्गजांनी वापरलं सिग्रल अ‌ॅप!

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.