विद्यार्थ्यांचा डान्स पाहून 2-2 मॅडमला राहवलं नाही, शाळेतच धमाकेदार डान्स!
दर तासाला वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओ व्हायरल होतात. सेलिब्रिटींच्या डान्स व्हिडिओंबरोबरच सामान्य भारतीयांचे डान्स व्हिडिओही चांगलेच पसंत केले जातात.
हा व्हिडीओ बघा. प्रजासत्ताक दिन 2023 चा सोहळा आहे, ज्यासाठी देशभरातील शाळांमध्ये 26 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरू असते. प्रजासत्ताक दिनी शाळांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात, ज्यात विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतात. प्रजासत्ताक दिन यायला अजून चार दिवस शिल्लक असले तरी त्यासंबंधीचे व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर आधीच अपलोड केले जात आहेत. यात काही जुने व्हिडीओ सुद्धा आहेत. असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात आपल्याच विद्यार्थिनींचा डान्स बघून शिक्षेकेला राहवत नाही आणि मग ती सुद्धा डान्स करू लागते.
इंटरनेटच्या या जमान्यात दर तासाला वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओ व्हायरल होतात. सेलिब्रिटींच्या डान्स व्हिडिओंबरोबरच सामान्य भारतीयांचे डान्स व्हिडिओही चांगलेच पसंत केले जातात.
हिट होत चाललेल्या शाळेतील मुलांच्या डान्स प्रॅक्टिसच्या व्हिडिओत स्वतः शाळेतल्या बाई सुद्धा धमाकेदार डान्स करतायत. या व्हिडिओमध्ये शाळेच्या मैदानात एक स्टेज असल्याचे दिसत आहे. बॅकग्राऊंडमध्ये पंजाबी गाणी वाजत आहेत.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये आपल्या मुलांच्या नृत्याने मंत्रमुग्ध झालेल्या शाळेच्या शिक्षिका स्वत:ला रोखू शकल्या नाहीत आणि त्यांनी स्टेजच्या खाली जबरदस्त डान्स स्टेप्स केल्या.
हिरव्या रंगाच्या साडीत मॅडमच्या उत्कृष्ट डान्स मूव्ह्स पाहून दुसरी मॅडम येते आणि तीही स्टेजखाली डान्स करू लागते.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यावर लोक जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत. मुलांसोबत नाचणाऱ्या मॅडमच्या अप्रतिम डान्स मूव्ह्सही तुम्हाला सुद्धा पाहायला मिळतील.